★आ.आजबेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा व बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात!
★आमदार बाळासाहेब आजबे काकांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमानेच ! – मंगेश पवार
पाटोदा | प्रतिनिधी
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त कुसळंब येथे तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन अमळनेर सर्कलचे गटप्रमुख मंगेश पवार यांच्या व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील सर्वच शाळांनी व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा परीक्षा कुसळंब येथील श्री.खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाल्या.
कुसळंब येथील खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेच्या आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी वस्ती शाळांनी व दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रथम बक्षीस दीपक घुमरे यांच्याकडून 5 हजार, द्वितीय बक्षीस युवराज झुनगुरे 4 हजार, तृतीय बक्षीस अण्णासाहेब टेकाळे 3 हजार, चतुर्थ बक्षीस किरण पवार 2 हजार, पाचवे बक्षीस शरद पवार 1 हजार, तर सतीश पवार फौजी (गावखारे) यांच्याकडून उत्तेजनार्थ चार पाचशे रुपयाची बक्षिसे होते , इत्यादी बक्षिसांचा सहभाग होता. स्पर्धेसाठी प्राचार्य एस के सर, शेलार सर, मंगेश पवार, किरण पवार, सचिन पवार, परसराम पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा नेते यश आजबे, दीपक घुमरे, युवराज झुनगुरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव बापू पवार हे होते तसेच शिवनाथ अण्णा पवार, श्रीहरी काका पवार, बाळासाहेब बाप्पा पवार, महादेव दादा पवार, मेजर शिवाजी पवार, आबासाहेब पवार, दत्तात्रय पवार, नवनाथ पवार एलआयसी, सरोदे फौजी, गुलाब भाऊ घुमरे, सुभाष पोकळे, दादासाहेब पवार, राजेंद्र सकुंडे, संजय घोशीर, ॲड.अशोक लाड, अमीन शेख, सुरेश पवार, बाळासाहेब तांबे, तुषार भोसले, बाळासाहेब लांबरुड, श्रीराम तुपे, आबासाहेब भोसले इत्यादी कार्यकर्ते नागरिक विद्यार्थी शिक्षक वर्ग संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेलार सर व पायके सर यांनी केले तर आभार मंगेश पवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व प्राचार्य सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे लाभल्याने हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
★35 शाळांच्या 150 विद्यार्थ्यांचा सहभाग!
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये पाटोदा तालुक्यातील कुस्ती शाळांच्या दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सर्व शाळांचे व विद्यार्थ्यांचे आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ कुसळंबच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
★विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा वाढदिवस आणि उपक्रम – यश आजबे
कुसळंब येथे घेण्यात आलेला तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचा उपक्रम हा आमदार बाळासाहेब आजबे काकांच्या वाढदिवसानिमित्तचा विशेष असून या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा उपक्रम अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
– यश आजबे
युवा नेता आष्टी पाटोदा शिरूर.
★बक्षीसे व विजेते!
या स्पर्धेसाठी दीपक घुमरे यांच्याकडून पाच हजाराचे बक्षीस कु.प्रसाद नाईकनवरे, युवराज झुनगुरे यांच्याकडून चार हजाराचे बक्षीस कु.प्रथमेश नाईकनवरे, अण्णासाहेब टेकाळे यांचे तीन हजाराचे बक्षीस कु.शिवराज पन्हाळकर, किरण पवार यांचे दोन हजाराचे बक्षीस कु.अवनी पवार, शरद पवार यांचे एक हजाराची बक्षीस कु.ईश्वरी चापकानडे या विद्यार्थ्यांनी पटकावले तर विशेष प्राविण्य सतीश पवार फौजी यांच्याकडून दिलेले दोन हजाराचे बक्षीस श्रेया मुंडे, सायली गंडाळ, अथर्व नागरे, दीपक करपे यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले.