★बेटी बचाव बेटी पढाव साठी विशेष बजेटची तरतूद करून इतिहास घडवा – दलितमित्र एकबाल पेंटर
पाटोदा | प्रतिनिधी
बेटी बचाव बेटी पढाव या घोषणाची अंमलबजावणी करण्यासाठी सावित्रीच्या लेकींनी १३ जुलैला भव्य मोर्चा काढला होता.व मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. आज बेटी / महिला सुरक्षित नाही याची कल्पना आपणास आहेच राज्याची सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे. ती प्रभावी व कठोर करण्याची गरज आहे. पालक हातबल झाले आहेत मुले उपवर झाली. चाळीसच्या वर जवळपास तिसीच्यापुढे गेले तरी लग्न होत नाही.बेकारीमुळे त्यांना एक तर मुलीचे प्रमाण कमी व नोकरी नाही. त्यामुळे मुलांमध्ये बायको सांभाळायचे धैर्य राहिले नाही. गरज भागविण्यासाठी निरागस बालिकांना उचलून गॅंग रेप पुन्हा तुकडे तुकडे करणे असे प्रकार वाढत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. मुलीचे संरक्षण नाही बेटी पढाव म्हणून नवे धोरण दिसत नाही. राज्य शासन १९९२ सालापासून शाळेत मुलींची गळती थांबवावी म्हणून पहिली ते चौथी अनुजाती, जमाती,भटक्या मुलीं जे दारिद्रय रेषेत आहेत त्यांनाच १ रु.उपस्थिती भत्ता दिले जाते मात्र १ रुपयाचे आता काहीही मोल राहिले नसल्याने स्त्री हीच जात समजून ७० वार्षिक उत्पन्न गृहीत धरून सर्व मुलींना १५ रु. भत्ता उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत द्यावे.तसेच खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येक जिल्ह्यात ४०० मुलींचे वस्तीगृह मंजुर करा व एसटी बस महाविद्यालया पर्यंत सकाळ-संध्याकाळ फेऱ्या सुरू कराव्यात व जागोजागी एसटी बस थांबे करावे अशी मागणी सावित्रीबाई फुले फातेमा शेख विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र एक बाल पेंटर यांच्या वतीने माननीय अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे..