” रक्षाबंधन व वृक्षाबंधन ” जि.प. वसंतवाडी शाळेचा कल्पक उपक्रम !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील वसंतवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी आगळावेगळा आदर्शदायी उपक्रम घेऊन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. शाळेमध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाबरोबर वृक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करून वृक्षांना राखी बांधून वृक्ष जोपासण्याचा संकल्प केला असून समाजाला वृक्ष संवर्धनाचा या उपक्रमातून संदेश दिला आहे.
बहिण भावाला राखी बांधते, भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी स्विकारतो. आणि राखीच्या रुपाने बहिणीचे आशीर्वाद कायम भावाच्या मनगटात आसतात.हाच धागा पकडून जि.प.प्रा.शाळा वसंतवाडी येथील श्री.भराटे सर व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसमोर एक वेगळाच आदर्श ठेवला. आज विद्यार्थी , शिक्षक यांनी शाळेत रक्षाबंधन व वृक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करुन वृक्षांना राखी व मुलांना राखी बांधून वृक्षांची जोपासना करण्याचा संदेश गावकऱ्यांना दिला. यावेळी शिक्षक वर्ग विद्यार्थी महिला उपस्थित होत्या.