★रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य ; लक्ष्यवेधी अंतराळवीर आंदोलन – डॉ.गणेश ढवळे
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातून जाणाऱ्या नगर रोड आणि जालना रोड तसेच मोंढा नाका जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्यावरील दुरावस्थेमुळे बीडकरांसह जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाणा-या वाहनचालकांची अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत सुरू असुन मणक्यांच्या व्याधींनी त्रस्त असुन मोठ्या प्रमाणावर अपघात घडलेले असुन बीडमध्ये नेत्यांची आणि पुढा-यांची कमतरता नसताना डझनावरी नेते असताना सर्वसामान्यांच्या हाल अपेष्ठांकडे त्यांचे दुर्लक्ष असुन शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य हे चंद्रग्रहावरील खड्ड्याप्रमाणे अधोरेखित होत असुन याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेख युनुस च-हाटकर, रामनाथ खोड यांनी अंतराळवीरांचा प्रतिकात्मक वेश परिधान करुन बीड शहरातील रस्त्यांवरून प्रवास करत नेत्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला.निवेदन जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद, राज्यपाल , मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देण्यात आले.
बीड शहरातून जाणाऱ्या नगर रोड बीड आणि जालना रोड आणि बार्शी रोड हे ३ प्रमुख मार्ग जातात.धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण व मजबुतीकरण झाल्यानंतर शहराच्या पुर्वेकडुन बाह्यवळण रस्ता झाला.त्यानंतर शहरातून जाणाऱ्या बार्शी रोड व जालना रोडची अनेक वर्षे दुर्दशा होती.दरम्यान बसस्थानक ते राष्ट्रवादी भवन आणि बसस्थानक ते काकु- नाना रुग्णालय या सिमेंट रस्त्याचे व उर्वरित दोन्ही बाजुंनी डांबरीकरण करून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले.बसस्थानकाकडुन बार्शी रोडकडे जाणा-या व सिमेंट रोड झालेल्या रस्त्यावर पुर्वीपासुन दुभाजक आहे.मात्र जालना रोडवर दुभाजक नसुन अद्याप त्याची बांधणी झालेली नाही.हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावरून कायम वाहनांची वर्दळ असते मात्र दुभाजक नसल्याने वाहने कोठुनही वळतात त्यामुळे अपघाताचा धोका आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा नव्याने नाली बांधकामही रखडलेले आहे.पावसाळ्यात वाहन चालकांना पुन्हा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.त्यामुळे या रस्त्यावरील दुभाजक तसेच नाली बांधकाम तातडीने करण्यात यावे.बीड शहरातुन जाणारा प्रमुख नगर रोड अनेक वर्षांपासून खड्डेमय आहे.याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालयासह अनेक शासकीय कार्यालये आहेत.मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्ता कुठे अशी अनेक वर्षांपासून स्थिती आहे.मे महिन्यांपासून या रस्ते कामाला सुरुवात झाली असुन त्यासाठीचे खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे.मात्र या रस्ते कामासाठी शहरातील फार वर्षांपूर्वीची जुनी झाडे तोडण्यात येत असुन शक्यतो झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि शासन नियमानुसार वृक्षतोड केल्यानंतर वृक्षलागवड व वृक्षसंगोपण सुद्धा झाले पाहिजे.जालना रोड मोंढा नाका (शिवशारदा बिल्डिंग)ते अक्षरधाम स्मशानभूमी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन जागोजागी खड्डे तसेच मोंढा पुलावरील सिमेंट रस्त्याचे लोखंडी गज उघडे पडले असून वाहनांचे टायर फुटल्याने अपघाताची दाट शक्यता आहे.तसेच पुलावरील संरक्षक कठडे गायब असुन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करुन कठडे बसविण्यात यावेत.तसेच बीड शहरातील खड्डेमय रस्ते तातडीने दुरुस्ती करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
★डझनभर नेते असताना सर्वसामान्यांचे हाल
बीड मध्ये नेत्यांची आणि पुढा-यांची काहीच कमी नाही डझनावरी नेते असताना सर्वसामान्यांच्या हाल अपेष्ठांकडे त्यांचे दुर्लक्ष असुन शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असताना रखडलेले रस्ते आणि खड्ड्यांकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही.चांगल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपडणारी नेते मंडळी या दुरावस्थेतील रस्त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नसल्याचे दिसून येते.बीड शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी आला मात्र रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी कुणी आग्रही नसुन त्यांचेच कार्यकर्ते ठेकेदार असल्याने दुर्लक्ष केल्याचे सर्वसामान्य जनतेने पाहिले आहे.