★नवनिर्वाचित DYSP संतोष खाडे गावी औतावर उभे ; वडील म्हणाले थांब मी फोटो काढतो
पाटोदा | सचिन पवार
स्वतःच्या मुलाचे जेव्हा कौतुक वडलाच्या तोंडून होत तेव्हा मुलाला मिळालेला आनंद हा देव भेटल्यासारखाच असतो. पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील नवनिर्वाचित डी वाय एस पी संतोष खाडे हे गावी असल्यावर वडीला बरोबर शेतात गेल्यानंतर आवतार उभे राहिले आणि वडील म्हणाले अरे थांब तुझा फोटो मीच काढतो आता, त्यावेळेस संतोषच्या भावना काय असतील त्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यासमोर आणि मनात उभ्या राहतीलच यात शंका नाही त्याच भावना संतोष खाडेच्या मनात उभे राहिल्या आणि फेसबुक पोस्ट सुद्धा केली. त्याच फेसबुक पोस्ट वरून लोकवास्तव च्या माध्यमातून लेखणीला धार देण्याचे काम आम्ही केल आहे.
नवनिर्वाचित DYSP संतोष खाडे यांच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यानंतर पत्रकारांच्या लेखणीला धार मिळतेच त्याच पद्धतीने त्यांच्या शेतातील आवतावरील फोटो अन तोही वडिलांनी म्हणजेच बापूंनी काढलेला फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. मुलगा मोठा झाला की त्याचा अभिमान आई बापाला होतोच परंतु तोच मुलगा पुन्हा आई-बाबा बरोबर शेतात जाऊन पहिल्यासारखाच राबायला लागतो तेव्हा आनंद बरोबर डोळ्यातील आनंदाश्रू सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात तेच आनंद अश्रू संतोष खाडे यांच्या वडिलांच्या डोळ्यात पाहायला मिळतात स्वतःचा मुलगा जेव्हा डी वाय एस पी झाल्यानंतर सुद्धा शेतात येऊन अवतार उभा राहतो तेव्हा वडील म्हणतात थांब जरा मी फोटो काढतो तुझा.. हा अविस्मरणीय क्षण नक्कीच प्रत्येक मुलासाठी असू शकतो त्याच पद्धतीने संतोष खाडे साठी सुद्धा आहे. प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक वडिलांना याच पद्धतीने आपलं नातं जपलं पाहिजे जे जगाला आपलंसं वाटेल एवढेच या लिखाणा मधून सांगण्याचा हेतू आहे.
★DYSP संतोष खाडेकडून नागरिकांना खूप काही अपेक्षा!
आठ्ठेगाव पुठ्यासह पाटोदा तालुक्यातील नागरिकांना संतोष खाडे कडून खूप अपेक्षा आहेत. सध्या युवकांना वकृत्वातून प्रोत्साहन देण्याचे काम या पद्धतीने करत आहेत. त्याच पद्धतीने त्यांच्या हातून नागरिकांना अभिमान वाटेल असेच कार्य व्हावं हीच अपेक्षा असून समाज हिताचे काम त्यांच्याकडून होईल ही सुद्धा अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
★आई-वडिलांच्या डोळ्यातील भावना आणि नागरिकांच्या अपेक्षा माझ्या कामाचं बळ – संतोष खाडे
जेव्हा जेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यातील भावना दिसतात आणि नागरिकांच्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त होतात तेव्हा तेव्हा माझ्या कामाला अधिक बळ मिळतं आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देखील मिळते येणाऱ्या भविष्यकाळात आई-वडिलांच्या डोळ्यातील भावना आणि नागरिकांच्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवूनच माझ्या कामाला अधिक धार मिळणार आहे..
– संतोष खाडे
डीवायएसपी