★युवा नेते सलीम पटेल व अबुरेहान पटेलयांच्याकडून काकांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम !
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळा कारेगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष सलीम पटेल व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अबुरेहान पटेल यांच्या पुढाकारातून मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांचे तालुका अध्यक्ष सलीम पटेल व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अबुरेहान पटेल यांच्या मार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबवत काकांचा वाढदिवस साजरा केला जातो याही वर्षी कारेगाव येथील शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले.यावेळी ग्रा. सदस्य असद पटेल, ग्रा.सदस्य जहीर सय्यद, शेख खालेक, साजिद सय्यद, रशीद पठाण, मुबीन पटेल, एजाज खान, हमजा सय्यद, शुकूर पठाण, सफदरअली सय्यद, सलमान पटेल, ईशाम पठान, शोएब सय्यद, आश्रफ पटेल, सज्जाद पठान, सलीम शेख, करीम पठाण व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
★काकांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमानेच – सलीम पटेल
गेल्या चार वर्षापासून आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त समाज हिताचे विविध उपक्रम घेत वाढदिवस साजरा करत आहोत याही वर्षी आम्ही कारेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला. यापुढे देखील असेच विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करत राहू.
– सलीम पटेल
अध्यक्ष अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा.