बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाउले !!
★आमदार पत्नी सौ. सविताताईनी स्वतः रक्तदान करत दिल्या अनोख्या शुभेच्छा..
आष्टी | सचिन पवार
मतदारसंघांमध्ये यावर्षी अद्याप पर्यंत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे त्यामुळे दोन दिवसापूर्वीच आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपण वाढदिवसानिमित्त हार तुरे फेटा स्वीकारणार नसून कार्यकर्त्यांनी फक्त भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा द्याव्यात कुठलाही मोठा उपक्रम न करता कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाने व साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा असे आवाहन केले होते त्यास आज कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला ,बोले तैसा चाले.… या उक्तीप्रमाणे आमदार बाळासाहेब आजबे यांनी कुठलाही हार तुरे फेटा सत्कार न स्वीकारता करता फक्त भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा स्वीकारल्या तर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या सुविद्यपत्नी सविता बाळासाहेब आजबे यांनी शिराळ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः रक्तदान करून आमदार साहेब यांना अनोख्या शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा सर्व कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.
आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मतदारसंघातील सर्व जनतेचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा कवच काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता आमदार बाळासाहेब आजबे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भेटण्यासाठी न येता गावामध्येच सामाजिक उपक्रम साध्या पद्धतीने राबवावेत गरजू व्यक्तींना मदत करून वाढदिवस साजरा करावा त्याच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा आहेत, त्यामुळे साध्या पद्धतीने हा वाढदिवस आमदार आजबे काका यांच्या आवाहनामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला कुठल्याही प्रकारचा सत्कार त्यांनी स्वीकारला नाही तर “हे पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे “अण मतदारसंघात वरील आलेले संकट दूर होऊ दे” अशी विठ्ठल पांडुरंग चरणी त्यांनी प्रार्थना केली आहे .
★आमदार पत्नी सविताताईंनी केले स्वतः रक्तदान!
आ. बाळासाहेब आजबे काका यांच्या शिराळ गावामध्ये कार्यकर्तेच्या वतीने वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये आमदार आजबे यांच्या सुविद्य पत्नी सविताताई बाळासाहेब आजबे यांनी स्वतः रक्तदान करत आमदार साहेबांना अनोख्या शुभेच्छा देत मतदारसंघातील जनतेलाही सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे.