★आजची सभा उत्तरसभा नव्हे, ही उत्तरदायित्व सभा- मंत्री धनंजय मुंडे
बीड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान शरद पवारांकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बीडमध्ये शरद पवार यांची नुकतीच सभा पार पडली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड शहरात आगमन झाले. त्यांचे बीडकरांनी जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले आहे. चौकाचौकात त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. अजित पवारांसोबत असलेले अन्य आठ मंत्री देखील या रॅलीत सहभागी झालेले आहेत. बीडच्या रस्त्यावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा दिसून येत नव्हती. स्वतः धनंजय मुंडे देखील अजित पवार ज्या ओपन जीपमध्ये उभे होते त्यांच्याशेजारी उभे दिसून आले. अजित पवारांचे बीड शहरात असे स्वागत करण्यात आले. लोकांची मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळाली.अजित पवारांचे बीड शहरात असे स्वागत करण्यात आले. लोकांची मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळाली.आज बीडमध्ये होणाऱ्या सभेतून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सभेत अजित पवार गटातील अनेक महत्वाचे नेते आणि मंत्री सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) एकूण 9 मंत्री देखील यात सहभागी झाले आहेत.
★तरुणांची मोठी गर्दी, आगे बढोच्या घोषणा
अजित पवार यांच्या स्वागतासाठी बीडमधील तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चौकाचौकात युवकांनी गर्दी केली होती. ‘अजित पवार तुम आगे बढो’, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा युवकांनी केल्या.
★सभेला जाण्यापूर्वी मेटेंच्या समाधीला अभिवादन
बीडमधील सभास्थळी जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या मोर्चा थेट बीड शहराकडे व सभास्थळाकडे वळवला.
★काल बारामतीत झाली अजित दादांची सभा
काल म्हणजे शनिवारी देखील अजित पवार यांची होम ग्राऊंड बारामती मतदार संघात जाहीर सभा झाली. कालच्या सभेत त्यांनी मतदार संघातील कामांचा पाढा वाचला. विकासकामे करण्यासाठी मी काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांनी मला साथ दिलेले असून यापुढेही तुमची साथ राहील, असा विश्वास अजित दादांनी व्यक्त केला.
★राष्ट्रवादी 100 टक्के फुटली ; ईडीमुळेच ते भाजपसोबत गेले – विजय वडेट्टीवार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर सभा घेत आहेत. म्हणजे राष्ट्रवादी 100 टक्के फूटली आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवारांच्या सभेला प्रतिसभा घेऊन उत्तर दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 100 टक्के फूटली आहे, असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीचे 9 आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत.