आ.बाळासाहेब आजबेंचा आदेश आला हजोरांच्या संख्येने उपस्थित रहा – उमेश पवार
पाटोदा | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये 27 ऑगस्टला होणारी सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची, दुष्काळ मिटवण्यासाठीची जाहीर सभा होणार असून, ही सभा बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात भव्य दिव्य होण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे हात बळकट करण्यासाठी 27 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी 3 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे होणाऱ्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी बीड जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान उमेश पवार यांनी केले आहे.