★नवोदय, कॉलरशिप इ. परीक्षेच्या धर्तीवर कुसळंब येथे तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. अमळनेर सर्कलचे गटप्रमुख मंगेश पवार यांच्या माध्यमातून कुसळंब येथे मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे, यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांचा सहभाग असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त अंमळनेर सर्कल गटप्रमुख मंगेश पवार यांच्या पुढाकारातून नवोदय स्कॉलरशिप इत्यादी परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या धरतीवर तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेमध्ये तालुक्यातील सर्व शाळांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले आहे. तसेच या स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व शाळांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान देखील गटप्रमुख मंगेश पवार यांनी केले आहे.
★नाव नोंदणीसाठी संपर्क
स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा शाळेतील शिक्षकांनी यांच्याशी संपर्क करावा. प्राचार्य एस के पवार मो. 9423471952, पर्यवेक्षक श्री शेलार सर मो.9637376900, मंगेश पवार मो.9503241183, किरण पवार मो.9545946790, सचिन पवार मो.9921801919, परसराम पवार मो.9764218847 यांच्याशी संपर्क साधून आपण नोंदणी करू शकता.
★स्पर्धा परीक्षेचा ठिकाण व अधिक माहिती
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त नवोदय कॉलरशिप इत्यादी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा श्री खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंब येथे आयोजित करण्यात आले असून तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा असल्याची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले आहेत तर सहभाग नोंदवल्या नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
★आमदार काका आदर्श म्हटल्यावर उपक्रम पण आदर्श – मंगेश पवार
आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका हे आदर्श आमदार आहेत. चार वर्षाच्या कार्यकाळात जनतेच्या त्याची कामे केली आहेत. जनतेला त्रासापासून मुक्त केला आहे. विकासाची गंगा आली आहे. असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आदर्श उपक्रम झाले पाहिजेत याच दृष्टीने आम्ही गेल्या चार वर्षापासून आदर्श उपक्रम घेत आहोत.
– मंगेश पवार
गटप्रमुख अंमळनेर जिल्हा परिषद सर्कल.