8 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

घ्या कप्पाळ मारून!

★अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली ; कायद्याने नवर्‍यावर पोस्कोअंतर्गत दाखल केला गुन्हा!

गेवराई | प्रतिनिधी

तलवाडा येथील अल्पवयीन सासरवासीन बाळांतपणासाठी माहेरी गेली असता तेथील डॉक्टरांनी ती अल्पवयीन आहे आणि गरोदर होऊन तिला बाळ झालेले आहे, अशा आशयाची माहिती तेथील पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणी शुन्याने तलवाडा पोलिसात सदरील अल्पवयीन विवाहितेच्या नवर्‍या विरोधात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. या घटनेने सामाजिक विवाह बंधन आणि न्यायव्यवस्थेतील विरुद्ध दिशेचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून गेल्या दोन-चार दिवसांपूर्वीच अशा प्रकरणात नवर्‍याविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, अशा आशयाचं जजमेंट सुप्रीम कोर्टाकडून आलेला आहे.
तलवाडा येथील 21 वर्षीय आकाश पिसुळे या तरुणाचा विवाह 2022 साली औरंगाबाद येथील एका मुलीसोबत झाला होता. ती गेल्या वर्षभरापासून सासरी सुखाने नांदत आहे. या एक वर्षाच्या कालखंडात ती अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली. त्यामुळे ती बाळांतपणासाठी गेल्या दोन-चार महिन्यांपूर्वी माहेरी औरंगाबाद येथे गेली. प्रसुतीसाठी तिला तेथील एका रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आले. ती प्रसुतही झाली. मात्र रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शासनाच्या सूचनेनुसार अल्पवयीन मुलगी गरोदर आणि तिला बाळ झाल्याबाबतची माहिती संबंधित पोलिसांना दिली. औरंगाबाद पोलिसांनी शुन्याने ती फिर्याद तलवाडा पोलिसात आली असता तलवाडा पोलिसांनी नवरा आकाश सखाराम पिसुळे याच्या विरोधात गु.र.नं. 203/2023 कलम 376, 376 (2), (एन) भा.दं.वि.सह कलम 4, 6 पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणातल्या अधिक माहितीनुसार संबंधित दाम्पत्याचा संसार सुखाने चालू असल्याचे सांगण्यात येते. मात्र केवळ संबंधित मुलगी अल्पवयीन आहे म्हणून हा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. बालविवाह रोखण्यासाठी उदात्त हेतुने कायदा करण्यात आला आहे. त्यासाठी शासन – प्रशासन आणि सामाजिक भान असलेली व्यवस्था प्रयत्न करत आहे, परंतु विवाह झाल्यानंतर अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली म्हणून नवर्‍यावर बलात्काराचा आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल होत असल्याने कायदा व समाज व्यवस्था यांच्यातील दरी वाढती दिसून येते. मात्र अशाच प्रकरणात गेल्या दोन-पाच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अल्पवयीन विवाहितेच्या नवर्‍यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करर्‍यात येऊ नये, आा आशयाचे जजमेंट दिल्याचे सांगण्यात येते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!