18.3 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

जाटनांदुर सर्कलमध्ये आमदार आजबेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाची रेलचेल!

★आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व किशोर जेधे यांच्या माध्यमातून मोफत प्रधानमंत्री संरक्षण विमा!

शिरूर | प्रतिनिधी

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. शिरूर तालुक्यातील जाटनांदुर सर्कल मध्ये आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व युवा नेते किशोर जेधे यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा मोफत काढून देण्याचा उपक्रम आ.आजबे काकांच्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते किशोर जेधे यांनी जाटनांदुर सर्कल मधील नागरिकांचा मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरून वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा ठरवलं असलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र सामाजिक उपक्रम घेऊन नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. हारतुरे बॅनर यावर खर्च न करता जनतेच्या हिताची उपक्रम घेऊन आपल्या नेत्याचा वाढदिवस करण्याचा संकल्प केला आहे. जाटनांदुर सर्कलमधील जाटनांदुर, जेधेवाडी, भिलारवाडी, ऊखवाडी, सवसवाडी, चाव्हुरवाडी, मोरजळवाडी, मुळीकवाडी, वडाळी, मदमापुरी, भडकेल, माळेवाडी, पिंपळनेर, पांगरी, खोपटी, इत्यादी गावातील जनतेचा मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरवून वाढदिवस साजरा केला जात आहे. यासाठी मा.सरपंच जाटनांदुर युवा नेते किशोर जेधे सह धर्मा जायभाये, संजय डोंगर ग्रा.पं.सदस्य, डॉ.संतोष वाल्हेकर, ग्रा.प. सदस्य वसंत जेधे ग्रा.प सदस्य, मनाजी सातपुते ग्रा.प.सदस्य, नाना मुळीक, ग्रा.प.सदस्य, बाबुराव खेंगरे ग्रा.प. सदस्य, राहुल चव्हाण, संभाजी सरगुडे ,बाबू कापसे, बाबा सातपुते, विठ्ठल भिलारे, नवनाथ भिलारे, संदीप जेधे, महादेव डोंगर, आसिफ शेख, हमीद पठाण, गोरख भोसले, सदाशिव मोरे, अशोक घायाळ, बाळू हराळे, अश्रुबा जाधव, भाऊसाहेब डांभे इत्यादी कार्यकर्ते मित्रपरिवार काम करत आहेत..

★वाढदिवस नेत्याचा ; उपक्रम समाजात हिताचा!

आमदार बाळासाहेब आजबे काकांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यातील जात नांदूर सर्कल मधील जनतेचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा मोफत काढून देण्याचा संकल्प केला आहे. युवा नेते किशोर जेधे यांनी घाटनांदुर सर्कल मधील नागरिकांचा मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढून देत आहेत. वाढदिवस नेत्याचा उपक्रम समाज हिताचा ही हॅशटॅग वापरत वाढदिवस साजरा केला जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!