★पारगाव सर्कल मध्ये दारोदारी जाऊन भरला मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा !
पाटोदा | सचिन पवार
आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा तालुक्यातील पारगाव सर्कल मधील नागरिकांचा भरला मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा. पारगाव सर्कलचे युवा नेते शरद गवळी यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम राबवले आहेत. जनतेच्या दारोदारी जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा मोफत भरून दिला जात आहे.
पाटोदा तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता शरद गवळी यांच्या माध्यमातून विविध उपक्रमाची रेलचेल सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम राबवून आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांचा मोफत प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरवला जात आहे त्याचबरोबर शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण इत्यादी उपक्रमाचे आयोजन युवा नेते शरद गवळी यांनी केले आहे.
★आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम घेऊन शरद गवळी जनतेच्या दारोदारी!
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त शरद गवळी यांनी विविध उपक्रम राबवत जनतेच्या दारोदारी जाऊन विविध उपक्रमाची रेलचेल सुरू केली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा मोफत भरला जात असून शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप तसेच वृक्षारोपण इत्यादी उपक्रम घेण्याचा संकल्प केला आहे.
★वाढदिवस हक्काचा नेत्याचा!
प्रत्येक नेत्याचा वाढदिवस कार्यकर्ता ज्या त्या पद्धतीने करत असतो. परंतु शरद गवळी यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या हिताची उपक्रम हाती घेऊन नेत्याला अभिमान वाटेल असा आणि जनतेला आधार मिळेल असा उपक्रम सुरू केला आहे. जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. जिथे अडचणी तिथे आमचा नेता आणि आम्ही खंबीर असा संदेशच त्यांनी दिला आहे.