युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनील काळे यांची निवड
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील रहिवासी सुनील काळे यांनी निष्ठेने व तन्मयतेने युवक काँग्रेस ध्येय धोरणाचे प्रचार व प्रसार सतत एकनिष्ठेने केल्याने पक्षांच्या वरिष्ठ नेत्यां खा.रजनीताई पाटील, माजीमंत्री अशोकराव पाटील, माजी नगराध्यक्ष केज आदीत्य पाटील,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख जिल्हा उपाध्यक्ष जुबेर भाई चाऊस जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे केज नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ भाऊ दांगट जिल्हा उपाध्यक्ष संचालक मार्केट कमिटी शिवाजीराव कोकाटे यांच्या आदेशानुसार ॲड श्रीनिवास बेद्रे यांनी निवड केली आहे.या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल शाहुराव जाधव ,नगरसेवक उमर चाऊस शेख इल्यास शहराध्यक्ष शेख इम्राननुर, काँग्रेसचे सरचिटणीस सय्यद रियाज, किशोर गाडेकर , राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शेख आसिफ (मुन्नाभाई केबलवाले) आनंद डोरले,लक्ष्मण भाकरे, तुषार कोकाटे,प्रा. दिलीप वाघमारे आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..