★राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र गहीनाथ गडाच्या समस्याकडे वेधले लक्ष !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेले आठ्ठेगाव पुठ्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (मुख्य समाधी स्थळ खालचा गहिनीनाथ गड) येथे बऱ्याच समस्या समोर असल्याने राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष सचिन पवार, बाबुराव अण्णा धारक, हनुमंत अण्णा पवार, अनिल गायकवाड, उमेश पवार यांनी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड मुख्य समाधी स्थळ (खालचा श्रीक्षेत्र गहीनाथ गड) येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची थोडी लाईट, रस्त्या अभावी गैरसोय होत आहे, हे लक्षात घेऊन राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सचिन पवार, बाबुराव धारक, हनुमंत पवार, अनिल गायकवाड, उमेश पवार यांनी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, त्या निवेदनाला आ.आजबे काकांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण करू असे सांगितले आहे. दोन्हीही मागण्या योग्य असून अजून काही मागण्या असतील त्या सुद्धा सांगा त्या सुद्धा पूर्ण केल्या जातील असे सुद्धा शब्द आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी दिला, आमदार साहेबांच्या या सकारात्मकतेबद्दल राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
★श्रीक्षेत्र गहीनाथ गडाच्या मुख्य समाधी स्थळासाठी राजमुद्रा संघटनेचा पाठपुरावा!
लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड मुख्य समाधी स्थळ येथे बऱ्याच समस्या असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून समोर आल्या होत्या त्या तक्रारीचे सोलुशन राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब आजबे काकांकडे मांडून लवकरच पूर्ण करून घेतल्या जातील त्यासाठी पाठपुरावा सुरू असून निवेदनाद्वारे आ.आजबे काकांकडे मागणी देखील केली आहे.