★राजकीय धार्मिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून सुरेश शेळके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !
धारूर / प्रतिनिधी
धारूर शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील उगवते नेतृत्व, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शन सुरेश शेळके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त भाजपा नेते मोहन जगताप,रमेश आडसकर, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे , माधव निर्मळ, धनलक्ष्मी अर्बनचे अंबादास सपकाळ, संतोष यादव, श्रीनिवास मोरे, लक्ष्मण शिरसाट ,बाळासाहेब गायकवाड, बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे नगरसेवक बाळासाहेब खामकर, बालाजी चव्हाण, सुरेश गवळी, बालाजी चव्हाण, बिबीशन गायकवाड, विजय शिनगारे, विनोद दादा शिनगारे, विशाल दिख्खत, रामदास तिडके, बिभीषण बडे, मोहन भोसले, संदीप शिनगारे, बजरंग शिनगारे, रमेश नखाते, सचिन नखाते, चंद्रकांत जाधव, यांच्या सह शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शन सुरेश शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसबा विभाग येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, धारूर शहराचे आराध्य दैवत श्री. अंबा चोंडी माता येथे महाआरती, जहागीरमोहा येथील दर्गावर चादर चढवण्यात आली. यावेळी सुजित वैरागे, सुशील शेळके,महेश आलाट, बबलू सावंत, उमेश पवार, अजय कोकाटे,रोहन गायकवाड, बबलू औताडे,धनु शिनगारे, हनुमान अंधारे, नाना शेरकर, राजू सरकाटे, विजय शिरसाट, राजू काकडे, सुनील गैबी, नवनाथ शिंदे, विजय शिरसाट, दत्ता थोरात, आकाश गैबी, बाबू फुके, संतोष वाणी, गणेश माने, सुशांत साखरे यांच्या सह राजमुद्रा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.