मानूर मठात नुतन नागनाथ व दुर्गा माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन संपन्न
शिरूर कासार | जीवन कदम
श्री तीर्थक्षेत्र नागनाथ देवस्थान जागीरदार मठ संस्थान मानूर मठामध्ये पुरातन प्राचीन अशा नागनाथ मंदिरामध्ये नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच दुर्गामाता प्राणप्रतिष्ठा व नागनाथ मंदिर कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री ष ब्र १०८ गुरु विरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज तसेच मठसंस्थांनचे समस्त शिष्य सदभक्त व मानूर ग्रामस्थ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दिनांक 19 ऑगस्ट रोजी नूतन मूर्ती मानूरमध्ये आल्यानंतर मानूर गावामध्ये सवाद्य मिरवणूक संपन्न झाली. दिनांक 20 रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्त पूजा संपन्न झाली व श्रावणी प्रथम सोमवार व नागपंचमीच्या स्थिर वेळ योगावर मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रम प्रसंगी श्री ष ब्र १०८ प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढेकर, श्री ष ब्र १०८ गुरू गंगाधर शिवाचार्य महाराज औंधकर यांचे सानिध्य लाभले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे पौरोहित्य म्हणून ज्येष्ठ माहेशरमूर्ती प्रकाश शास्त्री देवळालीकर, नागनाथ स्वामी तेरखेडा, व अनेक माहेशरमूर्तींच्या मंत्रघोषामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे यजमान म्हणून सौ.व श्री राजकुमार झाडबुके मुंबई, सौ व श्री प्रशांत हिरे बार्शी, सौ व श्री बाबुशेठ होनराव मानूर, योगेश कानडे बीड हे दाम्पत्य म्हणून होते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मठाचे सर्व शिष्य सदभक्त उपस्थित होते त्याचबरोबर मानूर गावातील सर्वच लहान थोर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्व शिष्य सदभक्त आणि मानुर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.