★अवघ्या १७% शेतकरी खातेदाराने केली पहाणीची नोंदणी
★शासनाच्या विविध योजना तसेच पिकविमा ,अनुदान आदींसाठी ई पिक पाहणी सर्व खातेदारांनी नोंदणी करून घ्यावी – तहसिलदार शिवनाथ खेडकर
शिरूर कासार | जीवन कदम
तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आपल्या शेतात पेरलेल्या पिकाची शासन निर्देशानुसार अजुनही ई पिक पहाणी नोंदणीकरणाकडे फारशे गांभिर्याने घेतलेले दिसत नाही ,यामुळे शासनाच्या विविध योजना तसेच पिक विमा , अनुदान असा लाभ मिळण्यासाठी अडचणीचे ठरू शकते तेव्हा सर्व शेतक-यांनी आपल्या शेतातील पिकाची ई पिक पहाणी नोंदणी करावी असे आवाहन तहसिलदार शिवनाथ खेडकर यांनी केले आहे .
खरीप पिक हंगाम पिक नोंदणीसाठी २.११हे अपडेट स्टोअर उपलब्ध करून देण्यात आले असुन सदरचे पिक पाणी स्वयंप्रमाणीत मानण्यात येणार आहे त्यापैकी दहा % तपासणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार असुन ४८ तासात खातेदारास स्वत: ची सुविधा उपलब्ध आहे , शेतक-यांना स्वतंत्र बटन देण्यात आले असून मदत कक्षासी संपर्क केल्यास अडचणीचे निरसन व शंका दूर केल्या जातील त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
★ मदतीचे अनेक द्वार !
गावातील सरपंच ,पोलीस पाटील ,तलाठी ,ग्रामसेवक ,कृषी सहायक,कोतवाल ,स्वस्त धान्य दुकानदार, तंटामुक्ती अध्यक्ष , बचत गट प्रतिनिधी , सहकारी संस्था अध्यक्ष ,सचिव ,दूध उत्पादक संघ , पोखरा प्रतिनिधी , ग्रामरोजगार सेवक ,तांत्रिक सहाय्यक , बॅंक प्रतिनिधी , शाळा ,महाविद्यालय विद्यार्थी , ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य,मिडीया प्रतगनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचे दरवाजे खुले केले आहे.
★फक्त १७% शेतक-यांनी हे नोंदणीचे काम
तालुक्यात ५२२५६ शेतकरी खातेदार असुन फक्त १७% शेतक-यांनी हे नोंदणीचे काम केले असल्याचे महसुल विभागाकडून सांगण्यात आले असुन उर्वरीत शेतकरी खातेदाराने १५ आक्टोबर पर्यंत १००% नोंदणीचे काम करून गरजेनुसार मिळणा-या योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरावे असे आवाहन तहसीलदार शिवनाथ खेडकर यांनी केले आहे.