★जुनेद शेख यांच्याकडून काका चषकचे आयोजन !
पाटोदा | सचिन पवार
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ पाटोदा व जुनेद शेख यांच्या आयोजनातून काका चषक आयोजित करण्यात आला असून 23 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य उद्घाटन महेश आजबे यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान युवा नेते जुनेद शेख यांनी केले आहे.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे काका चषक 2023 चे आयोजन करण्यात आले असून भव्य दिव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. प्रथम बक्षीस 51 हजार दुतीय बक्षीस 31 हजार तृतीय 21 हजार जाहीर केले असून सर्व बक्षीस मुन्ना शेठ यांच्याकडून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पाटोदा येथे चाऊस मैदान पीओपी कॉलेज पाटोदा येथे 23 ऑगस्ट रोजी महेश आजबे यांचा हस्ते उद्घाटन होऊन काका चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान युवा नेते जुनेद शेख व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ कडून करण्यात आले आहे.
★प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस मुन्ना शेठ यांच्याकडून…
काका चषक 2023 मध्ये होणाऱ्या प्रथम 51हजार, दुतीय 31 हजार, तृतीय 21 हजार बक्षीस जाहीर केले असून हे तीनही बक्षीस म्हणून असे त्यांच्याकडून देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
★काकांचा वाढदिवस युवकांना खेळत प्रोत्साहन देणारा – जुनेद शेख
आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा वाढदिवस हा युवकांना खेळामध्ये प्रोत्साहन देणारा ठराव यासाठी काका चषक 2023 आयोजन केले असून यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. खेळामध्ये येणाऱ्या अडचणीवर काका नेहमीच युवकांना प्रोत्साहन देत राहिल्याने या काका चषकाचे आयोजन केले आहे.
– जुनेद शेख
युवा नेता पाटोदा.