जनतेच्या जीवनात आपल्या सामाजिक, राजकीय कार्यातून प्रकाश टाकणारा दिपस्तंभ : सुरेश बप्पा शेळके
ज्याच्या रक्तातच अन्यायाविषयी चिड आहे जो अन्याय होत असेल तेव्हा कधी शांत बसत नसतो आणि नेहमीच प्रतिकार करण्यासाठी जिद्द असते असे राजमुद्रा सामाजिक संघटना स्थापन करून मनात रूजवून तयार झालेले झंजावाती किशोर आप्पा पिंगळे व माजलगाव मदारसंघाचे भाजपा नेते मोहन दादा जगताप यांच्या सर्व समावेशक नेतृत्वाखाली तयार झालेले व्यक्तीमत्व, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक तरूण नेतृत्व सुरेश बप्पा शेळके यांचा दि.२३ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा…
आपल्या अंगभूत हुशारी,कौशल्य,प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व्यवसायातही यशस्वी होतो व आपण समाजाचे काही देणे लागतो असे समजून राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रचंड काम उभे करतो. प्रत्येक दिवशी नव क्षितीज शोधणारे अफाट उत्साही व्यक्तिमत्व राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक मा. सुरेश बप्पा शेळके होय….
धारूर शहरात तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन करत व्यवसाय उभारणीसाठी सरळ हाताने मदत करण्याबरोबरच शहरातील सर्वसामान्य व्यावसायिकांच्या अडचणी वेळी धावून जात त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सुरेश शेळके हे राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोरअप्पा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात. मागील दीड दशकापासून राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी. प्रभावी आहे. अक्षरश: शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा सन्मान करण्यापासून अपंगांना मदतीचा हात देणे, सार्वजनिक ठिकाणी पाणपोई उभा करणे, रस्त्यावर हात गाडा चालवणाऱ्यांना ऊन-पावसाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी छत्र्या वाटप करणे असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, त्यावेळी हजारो पाण्याच्या बाटल्या पाठविणे, अशा कार्यातून त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी समोर त्यांनी शहरात बंद अवस्थेत असणाऱ्या बोअरमध्ये स्वखर्चाने पंप टाकत परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे केलेले कार्य मोठे आहे. तसेच, शिवजयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम, शेतकऱ्यांना खते वाटप, अशा सर्वच कामांत राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यतत्पर असणारे सुरेशबप्पा शेळके शहरातील अडचणीत असणाऱ्यांसाठी कायम मदतीचा हात घेऊन पुढे. असतात. धनलक्ष्मी अर्बन व जागृती मल्टीस्टेटच्या माध्यमातून तरुणांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देण्याचे काम ही सुरेश शेळके यांनी केलेला आहे.अशा तडफदार , प्रामाणिक नेतृत्व, राजकीय सामाजिक दिपस्तंभ म्हणून नाव लौकीक असणार्या सुरेश बाप्पा शेळके यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…..
★गरजूंना मदतीचा हात देणारे बाप्पा!
कोरोना काळामध्ये सुरेश बप्पा शेळके यांनी साधारण परिस्थीती असणाऱ्या रोजगार गेलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना राशन तसेच किराणा किटचे वाटप करत मदत केली. तसेच, नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साह देत लसिकरणाबाबतची भिती घालवत नागरीकांना लसिकरण केंद्रावर येण्या जाण्यासाठी ॲटो उपलब्ध करून देत प्रभावीपणे लसीकरण राबवण्यात प्रशासनास मोठे सहकार्य केले. त्याबरोबरच ऑटो रिक्षा उपाध्यक्ष च्या माध्यमातून अनेक रिक्षावाल्याच्या समस्या त्यांनी सोडवले आहेत काही रिक्षावाल्याला ड्रेसिंग केली होती धारूर, केज, वडवणी आदी भागांमध्ये सॅनीटायझर वाटपाचे कार्यक्रम यशस्वी केले. ऑटोरिक्षा चालक विलास ढोणे यांचा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी लातूर येथे जाऊन तब्येतीची विचारपूस करत वर्गणीच्या माध्यमातून रोख २५ हजाराची मदत, मुस्लिम आरिफ फारुक शेख तरुण पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना केलेली आर्थिक मदत उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे छायचत्र नसलेल्या एक चांगल्या उत्तीर्ण पास झाला असता त्याला पुढील शिक्षणासाठी दहा हजाराची आर्थिक मदत दिली होती वेगवेगळ्या परीक्षेतून शहरातील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करणे, शहरात शिवजयंती दहीहंडी सारखे उत्सव साजरे करण्याची शेळके हे आपले योगदान देत असतात. युथ क्लब सामाजिक संघटनेची धारूरमध्ये सुरुवात झाल्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून सहकार्यांसोबत केलेले सामाजिक कार्य ही उल्लेखनीय आहे. व 1999 वर्गमित्र गेट-टुगेदर साठी पुढाकार घेऊन गेट-टुगेदर च्या मार्फत बचत गट काढून बचत करण्यासाठी वर्गमित्रांना प्रोत्साहन करणे तसेच शहरातील नवोदित तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी धारूर प्रीमियम लीग तसेच मॅरेथॉन स्पर्धा सारख्या प्रकारात तरुणांना मार्गदर्शन करत अर्थसहाय्य करण्याचे कामही सुरेश शेळके हे करत असतात.
★राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जाळे रूजवले!
१५ वर्षांपूर्वी शहरात राजमुद्रा सामाजिक संघटनेची अधिकृत स्थापना करत त्यांनी सर्वसामान्यांना केलेली मदत मोठी आहे. त्याबरोबरच त्यांचं संघटन कौशल्य ही मोठ आहे. शहराबरोबरच तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांबरोबरच राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जाळे त्यांनी शहरा पेक्षाही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रुजवणे सुरुवात केली असल्याने त्यांचे संघटन कौशल्य दिसून येते. केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात त्यांचा असलेला संपर्क हा राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या संघटन वाडीमध्ये निश्चितच मोठा असल्याचे दिसून येते.
– प्रा.सचिन पवार