★मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आ.आजबेंचे आव्हान
आष्टी | सचिन पवार
बीड येथे दि. 27 ऑगस्टला सरकारमध्ये आल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहिर सभा होणार आहे. यावेळी आपण अजित दादांसमोर आष्टी – पाटोदा – शिरूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख विकास कामांचे प्रश्न मांडणार आहे. त्यासाठी मतदार संघातील कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
आ. बाळासाहेब आजबे यांच्या आष्टी येथिल संपर्क कार्यालयात आष्टी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आज दि. 21 रोजी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, पहाडी राजा माजी जि. प. सदस्य शिवाजीराव नाकाडे, काकासाहेब शिंदें परशुराम मराठे, हरिभाऊ दहातोंडे, जगन्नाथ ढोबळे शिवाजी शेकडे,महादेव डोके,सह इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, विरोधक हे अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक खा. शरद पवार यांच्या सभेला प्रतिसभा म्हणुन घेत आहे असे सांगत आहे. परंतु तसे काही नसुन केवळ ही सभा बीड जिल्ह्यातील विकास कामाची माहिती घेण्यासाठी घेतली जात आहे. या सभेमध्ये मी आष्टी – पाटोदा – शिरूर विधान सभा मतदार संघातील प्रमुख विकास कामांचे प्रश्न उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या समोर मांडणार आहे. त्यासाठी आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे.
★नांदूर, हतोळण युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आष्टी येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हतोळण येथील भाजपाचे युवानेते नितिन मिसाळ सह चार ग्रामपंचायत सदस्य तसेच नांदूर विठ्ठलाचे येथील सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब विधाते मामू, विजुभाऊ विधाते सावता परिषद आष्टी तालुकाध्यक्ष, चंद्रकांत विधाते उपाध्यक्ष सावता परिषद, भरतजी सोनटक्के सचिव सावता परिषद यांनी आज आ.बाळासाहेब आजबे काकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.
★नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
तालुक्यातील सालेवडगांवचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते महादेव डोके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी तर घाटापिंप्री येथील युवा नेते उमेश आमटे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आ. बाळासाहेब आजबे आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा बैठकीत सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.