★महाराष्ट्रात प्रथमच पाटोदा सेवा सहकारी संस्थेला मिळाला PHD. शिक्षण धारक संचालक !
पाटोदा | प्रतिनिधी
‘आपल्या वडिलांच्या समाजसेवेची प्रेरणा घेऊन लहानाचे मोठे होत असतांना सातत्याने गोरगरीब, दिन दलित, दुबळ्या ,अनाथ ,अपंग, शेतकरी, शेतमजूर आदी सह वंचित घटक आणि ऊसतोड कामगारांच्या जीवनात क्रांतीची मशाल पेटावी या व्यापक उद्देशातून सातत्याने रस्त्यावर संघर्ष करण्याची भूमिका मांडणारे उच्च विद्या विभूषित पत्रकार, समाजसेवक, युवा कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे लढाऊ, संजय गांधी निराधार कमिटीवर काम करणारे सय्यद साजेद भाई यांना पाटोदा सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी निवडून येण्याची संधी सर्वात जास्त 815 विक्रमी मताने विजय झाला.
दलित मित्र एकबाल पेंटर साहेबांच्या कार्याची मोठी व्याप्ती पाटोदा तालुक्यात आहे. सबंध आयुष्य त्यांनी पाटोदा शहरातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी शेकडो मोर्चे आंदोलने आणि उपोषण करून सरकार दरबारी हक्क घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कार्याला स्मरूण त्यांची वाटचाल सर्व स्पर्शी दिसते आहे.दलितमित्र पेंटर साहेबांच्या कार्याचा वसा आणि वारसा चालवणारा दमदार कार्यकर्ता म्हणून सय्यद साजेद त्यांच्याकडे पाहिले जाते. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष, जागृत पत्रकार, सूत्रसंचालक, वक्ता आदी सह विविध भूमिका एकत्र निभावणारा उच्च विभूषित एम. ए .पीएचडी शिक्षण झालेला असा कार्यकर्ता नुकत्याच झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून आला आहे. या निमित्ताने त्यांना मिळालेली संधी ही भविष्याची पेरणी असू शकते.सहकार व शिक्षण महर्षी रामकृष्ण बांगर, सौ.सत्यभामाताई बांगर, रा. काँ. पार्टी युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर, यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनातुन मिळालेले हे यश असून ही संधी गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल असा विश्वास विजयानंतर सेवा सहकारी सोसायटीचे नूतन संचालक सय्यद सज्जाद (साजेद भाई) यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.