★शहीद जवान भगवान नागरगोजे यांच्या स्मारकाची भूमिपूजन !
पाटोदा | प्रतिनिधी
8 डिसेंबर 2003 रोजी ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावातील भगवान नागरगोजे देशाच्या जम्मू काश्मीर पुच सेक्टर च्या सीमेवर शहीद झाले. त्यांच्या भव्य स्मारकाचं व्हावे अशी गावकऱ्यांची इच्छा होती त्यासाठी अनेक वेळा शासन दरबारी मागणी केली होती परंतु त्यांना यश आले नाही म्हणून हे काम त्रिदल संघटनेच्या व गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून व लोक सहभागातून केले जाईल असा शब्द महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी सैनिक अकुंश खोटे यांनी दिला होता. लवकरच हे स्मारकाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलं आहे. भगवान नागरगोजे यांना शहीद होऊन वीस वर्षे झाली आहेत. त्यांच्याजाण्याने नागरगोजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, वृद्ध आई वडिलांचा सांभाळ कोण करणार, हा मोठा प्रश्न होता. मात्र चुंबळी गावातील ग्रामस्थांनी आईबापांना मुलाची उणीव भासू दिली नाही. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून करत असल्याचं अंकुश खोटे यांनी सांगितले चुंबळी गावातील लोकांना सोबत घेऊन गावातल्या ग्रामस्थांनी त्रिदल संघटना यांनी स्वतः पुढाकार घेत शहीद भगवान नागरगोजे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, हे काम संपूर्ण लोकवर्गणीतून केले जात आहे. शहीद भगवान नागरगोजे यांचे स्मारक येणाऱ्या पिढ्यांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असं खोटे यांनी सांगितले म्हणून त्रिदल सैनिक संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अंकुश खोटे यांनी कारगिल विजय दिनाच्या दिवशी दिलेला शब्द १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चुंबळी फाटा तालुका पाटोदा येथे शहीद जवान भगवान नागरगोजे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडून दिलेला शब्द आज पूर्ण केला याप्रसंगी ह.भ.प राधाताई महाराज , सरपंच सत्यभामाताई बांगर ह.भ.प. सस्ते महाराज त्रिदल सैनिक संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अंकुश जी खोटे साहेब, वीर नारी नागरगोजे ताई, पाटोदा तालुकाध्यक्ष रामराव तांबे साहेब, बीड शहराध्यक्ष अशोक जायभाय साहेब हनुमान झगडे व आष्टी पाटोद्यातील सर्व माजी सैनिक तसेच त्रिदल सैनिक संघाचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते..