8.4 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ.सुरेश धस पॅनलचा धुव्वा ; सहकार महर्षी बांगर, आ.आजबेंच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय!

★पाटोदा सेवा सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल चा दणदणीत विजय !

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा सेवा सहकारी संस्था हि 19 गावची सोसायटी असून एकूण 13 संचालक या जागेवर उभे होते यात सेवा सोसायटी निवडणूकीत शेतकरी विकास पॅनल चे सर्व 13 उमेदवार विजयी झाले असून सुरेश धस यांच्या पॅनल शून्य वर बाद झाला असून शेतकरी विकास पॅनल चे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत या पँनल चे प्रमुख रामकृष्ण बांगर , दिपक घुमरे , बप्पासाहेब जाधव , युवा नेते बाळा बांगर सरपंच नारायण नागरगोजे , माजी प स सदस्य गुलाब घुमरे ,सरपंच नामदेव सानप ,नगरसेवक बाबू जाधव , राजा अण्णा भोसले , कॉ महादेव नागरगोजे ,गणेश कवडे , राजाभाऊ देशमुख यांनी पॅनल निवडून आणन्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या पॅनल चे उमेदवार सर्वसाधारण मतदार संघातून वीर दादासाहेब 816 मते , भोसले शहाजी 796, जाधव सुनील 782 मते ,घुमरे सुभाष 771,बामदळे बाबासाहेब 755,नागरगोजे राहुल 751,गर्जे हरिदास विठ्ठल 722,पवळ अश्राजी 717 मते घेऊन सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवार विजयी झाले असून अनुसूचित जाती जमाती मधून अडागळे बाबासाहेब 869, महिला मतदार संघातून जाधव लाखापती 823 मते , तर नागरगोजे तारामती 741 , obc मधून सय्यद साजिद 814,विमुक्त जाती जमाती मधून गर्जे रामदास 815 मते मिळाली असून विरोधी पॅनल ला खालील प्रमाणे मते मिळाली गर्जे मोहन 404,घुमरे अजिनाथ 500,घुमरे प्रमोद 470,घुमरे युवराज 471,जाधव महादेव 442,जाधव युवराज 470,नागरगोजे अनिल 445, नागरगोजे गोकुळ 28, भोसले उद्धव 443,सोनवणे भीमराव 488, नवले लक्ष्मी बाई 477,वीर गयाबाई 491,नाईकनवरे संतोष 525,कालूशे यशवंत 533 राज्यात सर्वात मोठी असणारी 19 गावची सोसायटी म्हणून या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते सदरील पॅनल सहकार महर्षी रामकृष्ण बांगर दिपक दादा घुमरे यांच्या नेत्रत्वखाली उभा केला होता सदरील पॅनल ने सुरेश धस पॅनल चा दारुण पराभव केला असून संपूर्ण राज्यात प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून या निवडणुकी कडे पाहिले जात होते विजयी उमेदवारांचे कृषी मंत्री ना धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!