★तहसीलदार म्हणतात केवायसी करून घ्या ; तलाठी मात्र घेतात दोनशे अडीचशे रुपये!
★शेतकऱ्यांच्या खिशात दमडी नाही ; इकडे 17 कोटी धुळ खात !
पाटोदा | भारत पवार
शेतकरी ने बँक खात्याची माहिती अद्यावत न केल्याने शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान वितरणास अडचणी निर्माण झाल्या आहेत एप्रिल 2023 मध्ये झालेल्या अवकाळी चे नुकसान अनुदान आणि सप्टेंबर 22 ते ऑक्टोबर 22या कालावधीत झालेल्या संतधर पावसामुळे शेती पिकाची झालेले नुकसान यासाठीचे मंजूर झालेले अनुदान वितरण ठप्प आहे. सुमारे 17 कोटी रुपयांची अनुदान वाटपाविना धुळखात पडून आहेत.
शेतकऱ्यांसाठी आलेले कोट्यावधी रुपये धुळखात पडून आहेत.मार्च 2023 मध्येझालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या काळात पाटोदा तालुक्यातील 265 शेतकऱ्यांच्या 186 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. पाटोदा तहसील ने याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला होता 186 शेतकऱ्यांनी त्यांच्या बाधित असलेल्या 130 हेक्टर जमिनीची माहिती अपलोड केली होती. 25 लाख 21 हजार 450 रुपये अनुदान याबाबत प्राप्त झालेले आहे.सप्टेंबर 2022 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तालुक्यात संतधार पाऊस झाला होता या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते शासनाने यासाठी सरसकट अनुदान देण्याची घोषणा केली होती. पाटोदा तालुक्यातील त्रेपन्न हजार पाचशे छप्पन शेतकऱ्यांचे 26801 हेक्टर क्षेत्र या पावसामुळे बाधित झाले होते नुकसानी पोटी अविस कोटी 87 लाख 8 हजार 500 रुपये एवढी मागणी तहसील कार्यालयाने शासनाकडे नोंदवली होती. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे परंतुकेवायसी नसल्याने कोट्यावधी रुपये धुळखात पडून आहेत. दुसऱ्या बाजूला केवायसी करण्यासाठी तलाठी केवायसी फी दीडशे ते दोनशे रुपये घेत असल्याच्या शेतकरी वर्गातून तक्रारी पुढे येत आहेत याबाबत तहसील विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी पुढे आली आहे.
★शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी
पाटोदा तालुक्यातील शेतकरी आणि बँक खाते अद्यावत करून घेण्याचे आवाहन केले आहे बँक खात्याला आधार क्रमांक जोडून केवायसी करून घ्यावी जेणेकरून अनुदान वाटप करण्यास सोयीचे होईल..
– बालाजी चितळे
तहसीलदार पाटोदा.
★शेतकऱ्यांना मिळणार हक्काचे अनुदान
सततच्या झालेल्या पावसामुळे पाटोदा तालुक्यातील जवळपास 55 हजार 556 शेतकऱ्यांना फटका बसला होता या सर्व शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या केवायसी यादीनुसार सर्वच शेतकरी अनुदानास पात्र आहेत मात्र सुमारे वीस हजार शेतकऱ्यांनी बँक खाते अद्यावत केलेली नसल्यामुळे अनुदान वाटपाची प्रक्रिया थंडावली आहे. केवायसी करण्यासाठी यादी मिळत नसल्याने तलाठी वर्गातून दोनशे ते अडीचशे रुपये केवायसी करण्यासाठी घेतल्याच्या तक्रारी सुद्धा समोर येत आहेत.
★शेतकऱ्यांची बँक खाते अद्यावत नसल्याने अडचणी
पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले. तहसील कार्यालयाने राज्य शासनाकडे पाठवलेल्या माहिती पैकी 33 हजार 335 शेतकऱ्यांचे खाते अद्यावत आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांचे खाते आधार क्रमांक अशी जोडून केवायसी केलेली आहेत सण आणि अनुदान पाठवताना केवायसी यादीनुसार 16 कोटी 29 लाख 54 हजार 350 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सात हजार हेक्टर बाजी जमीन असलेल्या सुमारे 27 हजार शेतकऱ्यांची बँक खाते अद्यावत नसल्याने अनुदान वाटपामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.