12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

निरंजन चा विधायक उपक्रम!

★ 200 विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व !

शिरुर कासार | जीवन कदम

अनाथ , एकल पालक आणि अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबातील दोनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व निरंजन सेवाभावी संस्थेने स्वीकारले आहे. या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. शहरातील एकलव्य विद्यालयात शैक्षणिक पालकत्वाचा सोहळा आज पार पडला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बाळासाहेब खेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी सचिन सानप हे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट यांच्या मातोश्री भिमाबाई कासट, निरंजन संस्थेचे कार्याध्यक्ष युवराज सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुणे येथील निरंजन सेवाभावी संस्था गेल्या 11 वर्षापासून तालुक्यातील अनाथ एकलपालक आणि अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांचे जीवन खुलवण्याचा प्रयत्न करीत आहे. कुटुंबाच्या आर्थिक कारनाणे विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे निरंजन च्या लक्षात आले होते. त्यासाठी सर्वतो जबाबदारी निरंजनने स्वीकारून ही गळती थांबवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे स्टेशनरी, वह्या, पेन, स्टीफन डब्बा, बॅग, आदी आवश्यक वस्तू संस्था पुरवत आहे.

बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून आहे. त्यातही शिरूर कासार तालुक्याचे अत्यंत वाईट अवस्था आहे. तालुक्यात कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प नाही. त्यामुळे सुशिक्षित बेकरांच्या हाताला काम नाही. पावसाच्या लहरीपणामुळे पेरलेले उगवेलच याची हमी नाही. त्यामुळे बहुतांश पालकांचा ओढा ऊस तोडणीकडे असतो. त्यात अनाथ एकलपालक आणि अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना तर शिक्षण घेणे अत्यंत कठीण जाते. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर व्हावा म्हणून निरंजन सेवाभावी संस्था गेल्या अकरा वर्षापासून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून या विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडावा यासाठी धडपड करीत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज शिरूर कासार येथे दोनशे विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू देण्यात आल्या.

★मुलांचे चेहरे खुलले!

निरंजन ने 200 विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरवल्यानंतर नवीन बॅग नवीन पुस्तके नवीन वह्या आधी पाहून मुले आनंदून गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेक मुले तर आनंदाच्या भरात उड्या मारतच घरी परतली आहे.

★उपक्रम स्तुत्य – तहसीलदार खेडकर

निरंजन सेवाभावी संस्थेने राबवलेला शैक्षणिक पालकत्वाचा उपक्रम हा स्तुत्य असल्याचे मत तहसीलदार बाळासाहेब खेडकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या उपक्रमाचे सोशल मीडिया वरती अधिकाधिक प्रसिद्धी व्हावी. या उपक्रमामध्ये अनेकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही उपस्थितांना केले.

★निरंजनच्या उपक्रमात सहभागी होऊ – सचिन सानप

निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्वच उपक्रम स्तुत्य असतात आजचा शैक्षणिक पालकत्वाचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे . निरंजन च्या विविध उपक्रमात जनतेनेही आपला सहभाग नोंदवला पाहिजे. निरंजन जेथे कोठे आम्हाला मदत मागील तेथे तेथे आम्ही निरंजन च्या या कार्यास मदत करू निरंजनच्या उपक्रमात सहभागी होण्यास आम्हाला आनंद वाटेल असे मत गटविकास अधिकारी सचिन सानप यांनी व्यक्त करून निरंजन ने आम्हाला वेळोवेळी अश्या स्तुत्य उपक्रमासाठी मदत मागावी आम्ही ती देऊ असे म्हटले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!