पत्रकारितेला पूर्णवेळ वाहून घेतलेला योद्धा – अनिल गायकवाड
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. गोरगरीब सर्वसामान्य दिन दुबळ्या अनाथ अपंग शेतमजूर कामगार ऊसतोड कामगारांसह वंचित घटकांना न्याय मिळावा आणि गुणवंतांचा सन्मान व्हावा या हेतूने वृत्तपत्र भूमिका निभावतात. अशा वृत्तपत्रांमध्ये गेल्या तीन दशकावरून अधिक काळ सातत्याने स्वतःला झोकून देत सदैव रस्त्यावर काम करणारा योद्धा म्हणून अनिल गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते.
बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील कुसळम येथील रहिवासी असलेल्या अनिल गायकवाड यांनी महाविद्यालयिन शिक्षणाला प्रारंभ करण्या पूर्वीच पत्रकारितेत स्वतःला झुकून दिले. दै प्रजापत्र व दैनिक लोकमतच्या माध्यमातून त्यांनी केलेला प्रवास आज तागायत निरंतर सुरू आहे.पाटोदा तालुक्यातील विशेषतः आटेगाव पट्टा परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या कामगारांच्या प्रश्न युवकांचे प्रश्न तसेच रस्ते वीज पाणी आधीसह समस्यांना अत्यंत ठळक अक्षरात प्रसिद्धी देऊन वाचा फोडण्याचे आणि त्यावर प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना निर्णय घेण्यास भाग पाडणारी त्यांची लेखणी आहे.परिसरातील विविध शाळा महाविद्यालयांच्या संदर्भात तेथील गुणवत्तेचा प्रश्न शेतकऱ्यांच्या संबंधित दुष्काळ किंवा या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींना वृत्तपत्रात त्यांनी स्थान दिले आहे. म्हणूनच याची दखल घेत अनेक वेळा त्यांना पुरस्कार देऊन सन्मान झाल्याच्या घटना आहेत.पाटोदा तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता आणि संयमाच्या माध्यमातून प्रशासनाला कामे करण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासन शासन आणि समाज व्यवस्था यामध्ये सहकार्याची आणि समन्वयाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
कुसळंब अंमळनेर पिंपळवंडी सुपा सावरगाव चिखली चिंचोली आदीसह तीर्थक्षेत्रांच्या अत्यंत पवित्र स्थळावर संत भगवान बाबा संत वामनभाऊ श्री खंडेश्वर यासारख्या देवदेवतांच्या स्थळी झालेल्या कार्यक्रमांचे उत्कृष्ट वृत्तांकन करून त्यांनी धार्मिक सामाजिक वैचारिक ऐक्य जपण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.अशा या विविध अंगी गुणांनी नटलेल्या परंतु तरीही अनेक वेळा त्यांच्यावर अनेक समस्या उद्भवूनही ते आपल्या कर्तव्यापासून दूर झालेले नाहीत. त्यांचे हे कार्य समाज हिताच्या दृष्टीने राष्ट्रहिताच्या दृष्टीने समता बंधुत्व ऐक्य सर्व धर्म समभाव आधी सह मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी सुरू राहावे यासाठी त्यांच्या अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा..!
★पत्रकारितेबरोबरच लोकांना आरोग्य देण्याचे उत्कृष्ट कार्य!
गेल्या दोन दशकापासून पत्रकारिता करत असताना लोकांचे सामाजिक व इतर प्रश्न सोडवीत असताना आता प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे चांगल्या आरोग्याची गरज आहे म्हणून त्यांनी लोकांचे आरोग्य कसे सुधारेल व लोकांनी आजारीच पडू नयेत म्हणून व जागतिक आरोग्य सल्लागार अमोल चोरमले सर शेख सलीम सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून वेलनेस व फिटनेस सेंटरच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे व बरेच लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे.
– प्रा.बिभीषण चाटे
लेखक उत्कृष्ट निवेदक.