★स्वातंत्र्य दिनानिमित्त अनाथ बालकांना शालेय साहित्य,फळे वाटप करुन विरेंद्रसिंह डुलगज, शारदाताई डुलगज व रोहित धुरंधरे यांच्याकडुन समाजाला नव संदेश!
बीड | प्रतिनिधी
भारताच्या ७७ व्या स्वात्रंत दिनानिमित्त आज बीड शहराजवळील ढेकणमोह, येथील पसायदान अनाथ बालक आश्रम येथे तेथील लहान मुलांना शालेय साहित्य, वही, पेन, फळे, व फळांचे झाडे वाटप करुन स्वातंत्र्य दिनी एक आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. सविस्तर बीड जिल्ह्यातील ढेकणमोह येथील अनाथ बालकांचा निवारा असणाऱ्या पसायदान अनाथ बालक आश्रम येथे वाल्मिकी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष विरेंद्रसिंह डुलगज, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई डुलगज, व रुग्ण मित्र फांऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित ऊर्फ (बाळासाहेब) धुरंधरे यांनी येथील लहान मुलांना शालेय साहित्य, वही पेन, फळे वाटप करुन समाजाला एक आगळी वेगळा नव संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
असेच अनेक सामाजिक कार्य करत रुग्ण मित्र फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित ऊर्फ (बाळासाहेब) धुरंधरे यांच्या माध्यमातून बीड सह महाराष्ट्र भरात अनेक ठिकाणी सर्व सामान्यांच्या आरोग्य लक्षात घेता मोफत महाआरोग्य शिबीर राबवले जात आहेत. यामध्ये मोफत औषधी, मोफत चष्मे, मोफत डायलेसीस, माफक दरामध्ये सिटीस्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, अशे अनेक अत्यावश्यक आरोग्य सुविधा गरजु रुग्णांना देण्याच पुण्ण्यांचे कार्य रोहित धुरंधरे यांच्या माध्यमातून रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र हे करत आहे.आजपर्यंत बीड शहरात अनेक नामांकित हॉस्पिटल मध्ये त्यांनी मोफत महाआरोग्य शिबीर घेऊन त्यांनी सर्व सामान्य गोरं- गरीब रुग्णांना मोफत व माफक आरोग्य सेवा निस्वार्थ पणे देण्याचं कार्य केले आहे. आजही स्वातंत्र्य दिनानिमित्त पसायदान अनाथ बालक आश्रम येथे मुलांना शालेय साहित्य फळे वाटप करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. आज स्वातंत्र दिनानिमित्त अनाथ बेघर बालकांना त्यांनी शालेय साहित्य फळे वाटप करुन आगळा वेगळा उपक्रम राबवुन समाजाला नव संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी स्टेजवर बोलतांना रुग्ण मित्र फांऊडेशन चे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी आपले अनमोल मत व्यक्त करुन सांगीतले कि समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपला वाढदिवस ईतर ठिकाणी साजरा न करता अशाच अनाथ बेघर मुलांमध्ये येऊन आपला वाढदिवस साजरा करावा, त्यांना शालेय साहित्य वाटप करुन आपला वाढदिवस साजरा करावा जेणेकरुन आपले पाहुन दुसरे लोक अशाच प्रकारे दिनदूबळ्यांच्या मदतीसाठी पुढे येतील. व यातुनच आपणांस भरभरुन आनंद मिळेल. यावेळी मंचावर उपस्थित वाल्मिकी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष विरेंद्रसिंह डुलगज सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई डुलगज, रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष रोहित ऊर्फ (बाळासाहेब) धुरंधरे, पसायदानचे गोवर्धन दराडे सर, उषाताई दराडे, ॲड सतीश शिंदे सर, पत्रकार संजय देवा कुलकर्णी, पत्रकार पाटील सर, सुतार सर, शेख बीलाल व इतर मान्यवर उपस्थित होते.