★टाकळगावच्या सरपंचा कडून सैनिकाला झेंडा फडकवण्याचा मान !
गेवराई | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शासकीय, राजकीय, गाव पातळीवरील सर्वच ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेवराई तालुक्यातील टाकळगाव च्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच रुद्रा कदम यांनी गावातील सैनिक रामेश्वर मसू बहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सैनिकाप्रति असलेला आदर सन्मान त्यांनी दाखवून दिला आहे.
गेवराई तालुक्यातील टाकळगाव च्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला सरपंच रुद्रा कदम यांनी गावातील सैनिक रामेश्वर मसू बहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान देऊन सर्वांनाच चांगला संदेश दिला आहे. देश सेवा करणाऱ्या सैनिका प्रति आपण आदर ठेवला पाहिजे त्यांचा सन्मान राखला पाहिजे त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे याच हेतून सरपंच रुद्रा कदम यांनी ध्वजारोहणाचा सन्मान सैनिकाला दिला आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे..