★ स्वातंत्र्यदिना दिवशी जनतेसाठी आमदार अजबेंनी केली अधिकाऱ्यांची झाडझडते !
आष्टी | सचिन पवार
आष्टी येथे 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सर्वसामान्य जनतेमधून आलेल्या तक्रारीचा पाढा वाचत अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं मिळवण्यासाठी जर अधिकाऱ्यांना पैसे पैसे द्यावे लागत असतील तर अशा अधिकाऱ्यांना चपलाने मारा बाकीचं मी पाहतो अशा कडक शब्दात लाज घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा आमदार बाळासाहेब आजबे यांनी चांगलाच समाचार घेतला.
शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे असं का म्हटलं जातं ते आज खऱ्या अर्थाने सर्वांच्या समोर आले. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या हक्काच्या विहिरी व घरकुल मिळवण्यासाठी जर लाज द्यावी लागत असेल तर यासारखं मोठं दुर्दैव कोणतं नाही. मी आज सर्वांना विनंती करतो तुमच्या हक्काचं काम करताना कोणतीही लाज देऊ नका, अन कोणता अधिकारी त्यांच्या हाताखालचे कुणी लाज मागत असतील तर अशांना चपलानी मारा बाकीचं मी पाहतो अशा कडक शब्दात आमदार बाळासाहेब आजबे यांनी 15 ऑगस्ट निमित झालेल्या आष्टी येथील बैठकीत सगळ्याच अधिकाऱ्यांची झाडझडती केली. आमदार बाळासाहेब आजबे यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त बैठकीत झालेले भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून सर्वसामान्य जनतेमधून आमदार बाळासाहेब आजबे यांचे कौतुका बरोबर धन्यवाद देखील मानले जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणारा आमदार म्हणून बाळासाहेब आजबे यांची ओळख निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनो तुमच्या अन्नात मला माती कालवायची नाही परंतु जनतेचे काम रखडले आणि त्यांना जर पैसे मागितले तर तुमची गाय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात पुन्हा धमकी वाजा इशारा आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे.
★हमे फ्लॉवर समजा क्या, हम तो फायर है!
स्वातंत्र्यदिनानिमित्त आमदार बाळासाहेब आजबे यांच्या आष्टी येथे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते, त्यावेळी अनेक नागरिकांच्या समस्या तिथे उपस्थित झाल्या त्याच वेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले मी ऐकून घेतो, शांत राहतो याचा अर्थ मी काही करणार नाही किंवा करत नाही असं नाही. मला फक्त तुमच्या अन्नात माती कालवायची नाही म्हणून शांत आहे, पण जनतेला त्रास झाला तर तुमची सुद्धा गय केली जाणार नाही, असा कडक इशारा वजा धमकी आमदार बाळासाहेब आजबे यांनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.. हा आमदार बाळासाहेब आजबे यांचा रुद्र अवतार पाहून सोशल मीडियावर जनतेकडून आमदार आजबे यांचा फोटो बरोबर ” हमे फ्लॉवर समजा क्या, हम तो फायर है!” अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.
★जनतेचे काम जर रखडले आणि पैसे जर मागितले तर याद राखा! – आ.आजबे
आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. अधिकारी आणि त्यांच्या अंडर खाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून विहिरीच्या कामासाठी घरकुलाच्या कामासाठी तसेच शासनाकडून येणाऱ्या सर्व योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. किरकोळ व लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा पैसे मागितले जात आहे. त्याचबरोबर तुमचं काम करायचं असेल तर याला बोला त्याला बोला व याची शिफारस आणि त्याची शिफारस आणा अशा तक्रारी येत आहेत. हे आता इथून पुढे चालणार नाही आणि असं कोणी करत असेल तर त्याला तिथेच चपलाने मारा बाकी मी पाहतो…
– आ.बाळासाहेब आजबे
आमदार आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघ.