★पाटोदा मराठी पत्रकार परिषदेची निवेदनाद्वारे मागणी

पाटोदा | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या आ.किशोर पाटील यांच्यासह संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटोदा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचेच्या वतीने निवेदनाद्वारे पाटोदा तहसीलदार नायब तहसीलदार मा. सुनील ढाकणे व स.पो. नि. पवार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांनी छापलेल्या बातमीचा राग मनात धरून आ. किशोर पाटील यांनी त्यांना अर्वाचे भाषेत शिवीगाळ केली. व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या समर्थकांनी महाजन यांना रस्त्यात अमानुषपणे मारहाण केली. याप्रकरणी पाटोदा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषद, हल्ला कृती समिती, तसेच सोशल मीडिया यांच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाटोदा तहसीलदारां, मार्फत निवेदन देण्यात आले.या निवेदनाद्वारे महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, आ.किशोर पाटील व त्यांच्या समर्थकावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावर सचिन पवार, हमीदखान पठाण, श्रीरंग लांडगे, अजय जोशी, सय्यद इम्रान, जावेद शेख, अशोक भवर, नानासाहेब डिडूळ, डिंगबर नाईकनवरे आदी पत्रकार उपस्थित होते.



