★बीड शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत शहरातील कोंडवाडा बनला कचराकुंडी
बीड | प्रतिनिधी
बीड शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे लहान मुलांसह वयोवृध्द नागरीकांना याचा धोका निर्माण झाला असून टोळकया टोेळक्यांनी कुत्रे गल्ली बोळात हिंडत असून त्यांची दहशत सध्या बीड शहरात वाढली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
बीड शहरात मोकाट कुत्र्यांची आणि जनावरांची संख्या वाढली आहे. शहरातील कोंडवाड्यात एकही जनांवर कोंडलेले नाही. हा कोंडवाडा कचरा कुंडी बनला आहे. मोकाट जनावरे आणि कुत्रे रस्त्यावर फिरत असल्यामुळे याचा वाहतूकीला मोठा अडथळा होत आहे. शाळेत जाणार्या लहान मुलांना या कुत्र्यापासून धोका निर्माण होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे त्याचा वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. नगर पालिकेने मोकाट कुत्रे आणि जनावरे कोंडवाडडयात कोंडावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.