[ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सरपंच सत्यभामाताई बांगर यांच्याकडून उपक्रमाची रेलचेल ]
पाटोदा | प्रतिनिधी
राज्यात व देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमांतर्गत मोजे भायाळा येथे विविध उपक्रमाची रेलचेल सुरू आहे. सरपंच सत्यभामाताई बांगर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुरुवारी भायाळा येथे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब व सरपंच सौ सत्यभामाताई बांगर यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिक तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायाळा च्या प्रांगणामध्ये शिलाफलक उभारणी करण्यात आला.
पाटोदा तालुक्यातील भायाळा गाव हे स्वातंत्र्य सैनिकाचे गाव म्हणून ओळखला जातो. याच गावाची अनेक वर्षापासून बांगर कुटुंबीय कुटुंब प्रमाणे जबाबदारी घेऊन गावाच्या विकासात भर टाकत आहे. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्याने गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी चार श्रीफळ देऊन सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेबांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमानिमित्त पंचप्राण शपथ सर्वांनी एकत्रित घेतली. या कार्यक्रमाप्रसंगी सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब यांनी आपल्या देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या सैनिकांचे महत्त्व विशेष नमूद केले तसेच युवकांना देखील महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये महिला स्वातंत्र्य सेनानी यांचा साडी चोळी देऊन सन्मान सरपंच सौ.सत्यभामाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यसैनिक मोतीराम बांगर आत्माराम बांगर यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने माजी सैनिक तसेच ग्रामस्थांची देखील उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. दिनकर बांगर सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
★स्वातंत्र्य सेनानी आणि माजी सैनिकांचा साल,श्रीफळ,फेटा बांधून सत्कार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भायाळा गावांमध्ये विविध उपक्रमाचे रेलचेल सुरू आहे. आज गावातील स्वातंत्र्य सेनानी माजी सैनिकांचा शाल श्रीफळ फेटे बांधून सत्कार करण्यात आला. सरपंच सौ.सत्यभामाताई बांगर यांच्या माध्यमातून भाया गावामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमाची रेलचेल पाहायला मिळत आहे.
★शिलाफलक उभारणी!
भायाळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळा येथे शिलाफलक उभारणी करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत होत असलेल्या उपक्रमातील भाग म्हणून गावातील स्वातंत्र्य सेनानी माजी सैनिक यांच्या सत्कार सोहळ्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायाळा येथे शिलाफलक उभारणी करण्यात आली.
★सरपंच सत्यभामाताई बांगर यांच्या माध्यमातून गावाच रूप बदलतय!
भायाळा गावच्या विकासात अधिक अधिक भर पडताना दिसत आहे. बांगर कुटुंबीय ज्या पद्धतीने गावाच्या विकासासाठी गावाच्या स्वाभिमानासाठी गावाच्या हक्कासाठी आजपर्यंत काम करत आहे त्याच पद्धतीने अधिक प्रमाणात काम जोमानं सुरू आहे. सरपंच सत्यभामाताई बांगर यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाबरोबर आपुलकीच्या नात्यात सुद्धा भर पडताना दिसत आहे. विविध उपक्रम घेत नागरिकांना आपुलकीची हाक देताना बांगर कुटुंबीय दिसत आहे.