★बीड-नगर रोडवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक चुंभळी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन संपन्न
पाटोदा | प्रतिनिधी
बीड नगर रोडवर गेल्या चाळीस वर्षांपासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाने अस्तीत्वात आहे.आता पैठण ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम डॉ बाबासाहेब आबेडकर चौकात रस्त्याचे काम सुरु असून संबंधीत गुत्तेदार व संबंधीत अधिकाऱ्यांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकच नष्ट करण्याचे कारस्थान केलेले आहे.
यापूर्वीही संबंधीत यंत्रणा व गुत्तेदार यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचे खांबावरील बोर्ड जेसीपी मशीनने खाली पाडून वातावरण कलूषीत करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळेस आपले कार्यालयास निवेदण देवून त्यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी आम्ही केलेली होती परंतू त्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आपणास कळविण्यात येते की, आपले कार्यालयाने संबंधीत जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाचे बांधकाम करुन घेणेबाबत पत्रव्यवहार केलेला आहे परंतू त्यावर संबंधीत यंत्रणेने कसलाही विचार न केल्याचे आम्हाला समजले आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाचे बांधकाम करुन सदरील चौकाचे सुशोभिकरण करण्याचे आदेश संबंधीताना दयावेत व तोपर्यंत सदरील रस्त्याचे काम बंद करण्यात यावे यासाठीगुरूवार दि 10/08/2023 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 11 वाजता वंचीत बहुजन आघाडी पाटोदा व इतर पक्षांतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता. यावेळी भिम सैनिक मोठ्या संख्येने होते.उपस्थित गोरख झेंड बाळासाहेब गायकवाड सचीन मेघडबर बाळासाहेब जावळे राजपाल शेंडगे नरेंद्र जावळे गोविंद यादव परसराम गायकवाड प्रदीप उबाळे सिद्धार्थ आगे प्रशांत सिद्धार्थ वाघमारे विजय राहुल बनसोडे आश्रुबा शिरसागर मिलिंद देवडे अमन जावळे मयूर थोरात सनी जावळे यांच्यासह तालुक्यातील नागरिक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भीमसैनिक होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी पोलीस बंदोबस्त भूमिका चोख बजावली आहे.
★प्रशासनाकडून आश्वासन!
प्रशासनाच्या वतीने ढाकणे साहेबांनी निवेदन घेऊन असे सांगितले की संध्याकाळी पाच वाजता माननीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब व संबंधित इंजिनियर व आंदोलन करते यांचे शिष्टमंडळ तुमची बैठक घेऊन चौकातील तोडगा काढू.
★ठोस तोडगा नाही निघाला तर आंदोलन
प्रशासनाने आम्हाला दिलेल्या आश्वासनानंतर जर संध्याकाळच्या बैठकीत तोडगा नाही निघाला तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सचिन मेघडंबर यांनी सांगितले..