★पाटोद्यात आझाद मैदानावरील उपोषणाला पाठिंबा म्हणून एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन
★तहसील कार्यालय समोर मराठा आरक्षणासाठी पाटोदा येथे धरणे आंदोलन
★ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा ; आता ओबीसी नेत्यांनी आणि मराठा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी !
पाटोदा | सचिन पवार
मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी धरणे लक्षवेधी धरणे आंदोलन केले. विविध संघटनेनी सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्के आरक्षण मिळावे म्हणून मोठ्या संख्येने मोर्चे निघालेले आहेत.
शिवाय वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने देखील करण्यात आली. परंतू समाजाला मात्र अद्यापपर्यंत आकर्षण मिळालेले नाही. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मुंबई येथील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शांततेच्या आणि लोकशाहीच्या पध्दतीने तहसील कार्यालय आवारात करण्यात आले. यावेळी बहुसंख्य मराठा समाज बांधव सह विविध संघटना व इतर समाज बांधव सहभागी झाले होते. सकल मराठा समाज पाटोदा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले..
★सर्व ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा
आझाद मैदानावरील ओबीसीतून 50% च्या आतील मराठा समाजाला आरक्षणासाठी धरणे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून पाटोदा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून 9 ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पाटोदा तालुक्यातील ओबीसी समाजाकडून या मागणीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला.
★धरणे आंदोलन स्थळी चहा नाष्ट्यासह जेवणाची व्यवस्था
मराठा समाज बांधवांकडूनच एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी आलेल्या पाटोदा तालुक्यातील सर्व बांधवांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक आंदोलनावेळी आपापल्या सोयीनुसार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी प्रत्येक जण काही ना काही मदत करत असतो नऊ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनावेळी काही ना काही मदत आणि सहकार्य तर कर्तव्य म्हणून सर्वजण पुढाकार घेतात याही वेळी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी सहकार्य केले आहे.
★10 ते 2 वेळेत एकदिवसीय धरणे आंदोलनाला मोठी उपस्थिती
पाटोदा तालुक्यातील मराठा समाजाकडून एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन सकाळी दहा ते दोन वेळेपर्यंत आयोजन करण्यात आले होते या धरणे आंदोलनाला पाटोदा तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.. या निवेदनात ओबीसी इथून ५० टक्के च्या आतील आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असे मागणीच निवेदन देऊन धरणे आंदोलन मागे घेतले.
★ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा ; आता ओबीसी नेत्यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा द्यावा
सर्वसामान्य ओबीसी समाजातील नागरिक मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आतील आरक्षण द्यावे या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा जाहीर करत आहेत. मराठा समाजाकडून स्वागतच केले जात आहे, परंतु सरकार मध्ये बसलेले आणि विरोधी बाकावर असलेल्या ओबीसींच्या मोठ्या नेत्यांनी आता जाहीरपणे मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आतील आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करावी हीच मराठा समाजाची अपेक्षा आहे..
★मराठ्यांचे नेते ओबीसीतून आरक्षण द्या म्हणतील ही अपेक्षाच नाही
मराठा समाजातील मराठ्यांची नेते ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी करतील अशी मराठा समाजाला तरी अपेक्षा नाही. कारण की राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठ्यांना आरक्षण मिळू नये हीच भावना त्यांची आहे असंच दिसते आहे. कारण की आजपर्यंत एकही मराठा आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली नाही परंतु सर्वसामान्य ओबीसी समाज म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या.. ओबीसी समाजाचा मराठा समाजाकडून खूप खूप अभिनंदन केलं जात आहे.. त्यामुळे मराठा नेत्यांकडून आता अपेक्षा आहे की ओबीसी कोट्यातून 50% च्या आतील मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवावा…