आरक्षण !
पुन्हा तीच शिस्त
पुन्हा एकदा मोर्चा
मराठा आरक्षणाची
आज महाराष्ट्रावर चर्चा..
ग्रामपंचायत ते तहसील पर्यंत
आपण आज धरणं धरू,
आझाद मैदानावरील मावळ्यांचं
जाहीरपणे समर्थन करू..
मराठा आरक्षणाची मागणी
असेल आता कायदेशीर,
समाजाच्या उज्वल भविष्यासाठी
ती ठरणार आहे फायदेशीर..
सर्वपक्षीय नेत्यांनो तुम्ही
आता कायद्याचं बोला..
कुणालाही धक्का न लावता
हा मोघम नकोय टोला …
आमच्या समाज बांधवाप्रमाणेच
आम्हालाही कुणबी म्हणा…
कायद्याच्या चौकटीतलच
मराठ्यांना आरक्षण द्या ना…
आम्ही दर्जा व संधीची समानता
या कृतीची वाट बघतोय,
आमच्या न्याय व हक्काचं
आरक्षण आज मागतोय!
आरक्षण आज मागतोय!!
– श्री.संजय शेळके
मो.नं.9975228585