★विद्यार्थ्यांनी काय बनायचे हे स्वतःच ठरवावे-जिल्हाधिकारी काकडे
कुसळंब | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये संघर्ष केला पाहिजे.प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना खूप कष्टाने जिद्दीने अभ्यास करून कोणत्याही क्षेत्रात खूप मोठे व्हावे असे मार्गदर्शन व मोलाचा संदेश महंत ह.भ. प.महादेवानंद भारती महाराज यांनी दिला.
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील श्री.स्वामी अमृत भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे दि.६ रविवार रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व शालेय गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र अश्वत्थलिंग संस्थांनचे मठाधिपती तथा श्री.गंगा भारती महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महंत महादेवानंद भारती महाराज तसेच सुभाष काकडे जिल्हाधिकारी (मुंबई),कांबळे जिल्हा न्यायाधीश बीड,धनंजय शिंदे गटशिक्षणाधिकारी गेवराई,युवा नेते सागर धस,ह.भ.प.राम महाराज डोंगर, प्रेमानंद महाराज,आसाराम साबळे, शिवाजी महाराज हनुमान टेकडी, मस्कर महाराज,मिनाताई मडके महाराज,शिवानंद महाराज,बबन काशिद,अनिल महाराज,भाऊसाहेब भवर,निलेश मोरे,दादासाहेब पवार उपसरपंच,उद्धव पवार,बाळासाहेब पोकळे,ॲड.एन.एन.साबळे,जोगदंड सर,मु.अ.ए.एम.पवार सर,कुस्तीपटू सुजय तनपुरे,गणेश तनपुरे,शिवगंगा मत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी,महादेवानंद भारती महाराज म्हणाले की,जोगदंड सर हे अनेक वर्षापासून संत निवृत्ती महाराज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गणवेश वाटपाचे आयोजन करीत आहेत.इयत्ता ५ ते ८ वी च्या २०० विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद होय.
जिल्हाधिकारी काकडे यांनी मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना १० वी १२ वी नंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे ते ठरवून मोठ्या कष्टाने अभ्यास करून आपल्याला काय बनायचे हे निश्चित ठरवून नावलौकिक करावा,असे मार्गदर्शन केले.न्यायाधीश कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महान नेत्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न पहावे.इंग्रजी शिक्षणावर जोर द्यावा.अपयशाची तमा न बाळगता शिक्षण घेत राहावे असे मनोगत व्यक्त केले.सागर धस म्हणाले की,देशाचे भवितव्य घडविणे हे विद्यार्थ्यांच्याच हातात आहे.देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण खूपच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानाचा अभ्यास निवडवावा व प्रगती करावी.याप्रसंगी, स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाह रोखण्याचे आवाहान केले.यावेळी जोगदंड सर,धनंजय शिंदे, आसाराम महाराज,अनिल महाराज, शिवगंगा मत्रे,बबन काका काशिद,राम डोंगर महाराज आदींनी मोलाचे मार्गदर्शन करून महाराजांनी पिंपळवंडी सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून अध्यात्माला शिक्षणाची जोड दिली आहे असे भाषणातून उल्लेख केला. कार्यक्रमाला रामदास खिलारे, रामकृष्ण भोंडवे,दिनकर तांबे, आप्पासाहेब मडके,भगवान काकडे, भागवत खरमाटे,श्रीपती गाडे, उद्धव रहाठे,कल्याण वाणी,वैष्णवी काकडे, मैनाताई पवार,आसाराम भोसले,संजय घोलप,मत्रे मुकादम, अंबादास बंड,सुंदर जाधव,लवांडे मुकादम,आसराजी खिलारे,संतोष उतळकर,जालिंदर पवार,बंडू पवार,गोकुळ राऊत,विघ्ने सर,माऊली देवकाते,शिंदे अण्णा,पत्रकार गोकुळ पवार,बबन उकांडे,भाऊसाहेब पवार,के.टी.पवार आदीसह परिसरातील ग्रामस्थ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्तावना व सूत्रसंचालन मुख्याध्याप ए.एम.पवार सर यांनी केले.
★विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव
चित्रकला,एन.एम.एस तसेच १०वी, १२ वी परीक्षेत प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक घेऊन व इ.५ वी,८ वी मधील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
★धोंडे जेवणाचे आयोजन
अधिक श्रावण धोंड्याचा महिना असल्याने कार्यक्रमाला आलेल्या संत-महंत,अधिकारी-पदाधिकारी, लोकप्रतिनिधी-ग्रामस्थ पाहुण्यांना कार्यक्रमानिमित्त धोंडे जेवणाचे आयोजन केले होते.त्यात पुरणपोळी, गुळवणी, भात,आमटी,भजे,कुरडई, पापड,जिलेबी सह गोड धोंड्याचा समावेश होता.या गोड स्वादिष्ट जेवणाचा जमलेल्या सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन आस्वाद घेतला.