23.9 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

राजकीय क्षेत्रात जड झाल्याने बाईला पुढे करून बदनाम करण्याचा प्रयत्न – संजय खोटे

★आट्ठेगाव – पठ्यात संजय खोटेला राजकीय दुसरा सक्षम पर्याय नसल्याने बिन बुडाचे आरोप करून बदनामी !

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील मुगाव चे कर्तव्यदक्ष सरपंच संजय खोटे हे नेहमीच गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे सरपंच म्हणून ओळख झाली आहे. आणि राजकीय क्षेत्रात चांगलेच वजन निर्माण केल्याने त्यांना सक्षम विरोधक नसल्याने त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून परिसरात त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी पीडित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केल्याची बातमी समोर येताच. संजय खोटे यांनी त्यांची बाजू वर्तमानपत्राशी चर्चा करताना स्पष्ट केली आहे. संजय खोटे यांनी या तक्रारी बद्दल स्पष्ट नाकार देत माझा कसलाही संबंध नसताना असा आरोप झाल्याचा खुलासा केला आहे.
सविस्तर वृत्त असे की काही दिवसापासून संजय खोटे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे महिलेला पुढे करून त्या पतीला सोबत घेऊन कोणीतरी जाणून-बुजून संजय खोटे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनतेमध्ये संजय खोटे यांची प्रतिमा स्वच्छ असल्याने सर्वसामान्य नागरिकाला त्यावर विश्वास नाही.. सर्वसामान्य जनता म्हणते संजय खोटे असं करू शकत नाही परंतु त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान असू शकतं अशी ही कुजबुज जनतेमध्ये आहे. जनतेच्या मनावर राज्य करणार नेतृत्व म्हणून संजय खोटे यांची ओळख आहे संजय खोटे चुकीचं वागतील असं जनतेला तरी पटणार नाही असं जनतेमधून कुजबुज पुढे येत आहे परंतु त्यांना बदनाम करण्याचे हे नक्की षडयंत्र असू शकतं अशी ही जनता कुजबुज करत आहे. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल परंतु अशी बदनामी करून काय मिळणार असाही जनतेमधून तूर निघत आहे. एखाद्याला इतकंही बदनाम करू नये की त्याचं कुटुंब उध्वस्त होईल. स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्याची बदनामी करणं कितपत योग्य असेही जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

★आट्ठेगाव पुठ्यात संजय खोटे यांचे वजन वाढले ना हे कट कारस्थान!

मुगगावच्या सरपंच पदाची धुरा जनतेने संजय खोटे यांच्यावर सोपवल्यानंतर त्यांनी जनतेचे केलेले कामे आणि जनतेच्या मनावर कामातून मिळवलेल राज्य कुणाच्यातरी डोळ्यात सलतय. जनता मंती दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल परंतु तोपर्यंत एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल इतकी बदनामी करू नये..आट्ठेगाव पुठ्यात संजय खोटे यांचे वजन वाढले ना हे कट कारस्थान असल्याचंही बोललं जात आहे..

★एखाद्याची बदनामी किती करावी याला अंत आहे की नाही – संजय खोटे

माझ्यावर झालेले सर्व आरोप हे भविष्यातील सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदासाठी मी दावेदार असल्यामुळे माझे अस्तित्व संपवण्यासाठी विरोधकांनी रचलेला हा रडीचा डाव सुरू केला आहे. माझ्यावर केलेल्या आरोप सर्वच खोटे असून घटनेच्या वेळी मी गावात देखील नव्हतो त्यामुळे लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल यात शंका नाही परंतु एखाद्याची इतकी ही बदनामी करू नये की त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल उपर वाले के घर मे देर है लेकिन अंधेर नही..
– संजय खोटे
मा. सरपंच मुगगाव.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!