★पारगाव जिल्हा परिषद गटाची बैठक म्हणजे उद्याच्या विजयाची नांदी !
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी नुकतीच पाटोदा विश्रामगृहावर पाटोदा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पुढील दिशा धोरण काम करण्यासाठीच्या नवनवीन सूचना देत पक्ष वाढीसाठी काम करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लागलीच पाटोदा तालुक्यातील अमळनेर डोंगरकिन्ही आणि पारगाव गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीनुसार बैठका लावून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आज पारगाव जिल्हा परिषद गटाची महत्त्वाची बैठक पाटोदा विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पारगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाटोदा विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या काळात आमदार बाळासाहेब आजबे काकांच्या माध्यमातून उर्वरित विकास कामे करून जनतेला त्यांच्या हक्काचे मिळून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचा सुद्धा सांगितले तसेच अधिकारी पदाधिकारी यांनी अधिक जोमाने काम करण्याचं या ठिकाणी ठरवले. आमदार बाळासाहेब आजबे काकांनी दिलेले सूचना आणि आदेशाचे पालन करत जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचा ठरवले आणि उद्याच्या विजयाची महत्त्वाची नांदी आपणच उभी करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी जेष्ठ नेतेमंडळी पदाधिकारी युवा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★पारगाव गटाबरोबर अंमळनेर, डोंगरकिन्ही गटातील कार्यकर्ते लागले कामाला!
आमदार बाळासाहेब आजबे काकांचा आदेश आला आणि पारगाव अमळनेर डोंगरकिन्ही गटातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहे. नुकतीच अंमळनेर गटाची बैठक सौताडा येथे संपन्न झाली तर डोंगरकिन्ही गटाची बैठक सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली तर आज पारगाव गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पाटोदा विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तीनही गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कामाला लागलेले चित्र दिसून येत आहे..
★नवख्यांना मिळणार संधी
येणाऱ्या निवडणुकीबरोबर पाटोदा तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या संदर्भात महत्त्वाच्या चर्चा संपन्न झाल्या असून त्यामध्ये सर्व नवख्यांना संधी मिळणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक बळ मिळणार असून येणाऱ्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचा सुद्धा चित्र दिसत आहे.