★9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाचे आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन!
★पाटोदा सकल मराठा समाजाचा पाठिंबा ; पाटोदा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन !
पाटोदा | सचिन पवार
मराठा समाजाच्या हक्काचा आरक्षण मिळण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे याचा आता अंतच झाला आहे. किती मोर्चे की बलिदान द्यावे लागले तरीदेखील सरकारला जाग यायला तयार नाही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही ओबीसी नेते विरोधात आवाज उठवायला कमी पडेनात.. पुन्हा एकदा 9 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चा कडून आयोजित दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन पाटोदा तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे…
मराठा समाजाला आता ओबीसीतून 50% च्या आतील हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे या आंदोलनाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाठिंबा दर्शवण्यात येत आहे एक दिवशी धरणे आंदोलन करून पाठिंबा दर्शवला जाणार आहे. याच धरतीवर पाटोदा तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने पाटोदा तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करून पाठिंबा दर्शवण्यात येणार आहे. यासाठी पाटोदा तालुक्यातील सकल मराठा समाजाने नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाटोदा तहसील कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे आव्हान सकल मराठा समाज पाटोदा तालुक्याच्या वतीने केले आहे.
★आता ओबीसीतून 50% च्या आतील मराठ्यांना आरक्षण!
मराठा समाजाच्या हक्काचं ओबीसीतून मिळणार 50% च्या आतील आरक्षण अधिकृत घेण्यासाठी मराठा समाजाकडून आक्रमक पवित्र घेतला जात आहे आझाद मैदानावर 9 ऑगस्ट रोजी ओबीसीतून 50% च्या आतील मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे मागणीसाठी या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाकडे सरकार कोणत्या दृष्टीने पाहते हे पहावं लागेल. तयाचा परिणाम सरकारला भोगावच लागेल…
★मराठा आमदार एकही बोलायला तयार नाही
मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आतील आरक्षण द्यावे अशी मागणी एकाही मराठा नेत्याकडून होताना दिसत नाही. पण मराठा समाज रस्त्यावर उतरून आता ओबीसीतून 50% च्या आतील आरक्षण द्या या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आमदारांनी आता जागृत होऊन मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे 50% च्या आतील मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मागणी करावी असे देखील आव्हान सकल मराठा समाजाकडून होत आहे.
★मराठा नेत्यांनी ओबीसी नेत्याकडून आदर्श घ्यावा!
मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी नेत्याकडून आदर्श घेण्याची वेळ आली आहे जेव्हा मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो त्याचवेळी ओबीसी नेते याच आरक्षणाला विरोध करतात. मग मराठा समाजाने थेट आता त्यांच्या हक्काचं ओबीसी कोट्यातील 50% च्या आतील आरक्षणाची मागणी केली आहे. आता ओबीसी नेते काय भूमिका घेणार आणि मराठा नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मराठा समाजातील नेत्यांची अजूनही वेळ गेली नाही त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आतील मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करावी.. अन्यथा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही.. त्यातही तीळ मात्र शंका उरली नाही..