★माणुसकीची भिंत पाटोदा येथे सचिन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान !
पाटोदा | प्रतिनिधी
सामाजिक, राजकीय कार्य करताना लेखणीची आवड निर्माण झाल्याने स्वतःला लेखणीत झोकून घेतले आणि निर्भीड पत्रकारिता सुरू केली आणि आज सर्वांनाच त्यांच्या लेखणीचा अभिमान वाटावा असं त्यांचं लेखन समाज हितासाठी समाज हक्कासाठी होताना दिसत आहे. निर्भीड पत्रकार सचिन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला सर्वसामान्य नागरिक ते आमदार साहेबांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी सुद्धा शुभेच्छा देऊन त्यांच्या लेखणीला अधिक बळ देण्याचं काम केलं आहे.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील निर्भीड पत्रकार सचिन पवार यांनी त्यांच्या पत्रकारितेला स्वतः समाजकार्य आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना सुरुवात केली परंतु त्यांना पाहिजे आहेत तशा बातम्या आणि कामानुसार बातम्या येत नसल्याने त्यांनी पत्रकारिता करण्याचा ठरवलं आणि आज सर्वांच्याच मनावर लेखणीच्या माध्यमातून राज्य करत आहेत. त्यांच्या लेखणीबद्दल राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांना साजेच्या असतील तशाच पद्धतीच्या तितक्याच भारदस्त शुभेच्छा सुद्धा देऊन त्यांच्या लेखणीला बळ दिले आहे. आमदार बाळासाहेब आजबे काका, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे, राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सभापती किशोर आप्पा पिंगळे यांनी विशेष फोन करून शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत त्याचबरोबर पत्रकारिता, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्षेत्रातील सर्वच मान्यवरांकडून हितचिंतकाकडून तसेच मित्र परिवाराकडून विशेष सत्कार करून देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
★वाढदिवसाला मिळणाऱ्या शुभेच्छा माझ्या कार्याची जाणीव करून देणाऱ्या – प्रा.सचिन पवार
मला वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छा ह्या मला माझ्या कार्याची जाणीव करून देणारे आहेत. लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखणीचं काम आजपर्यंत केला आहे. यापुढे देखील समाजाच्या हिताचं आणि हक्काचं मिळून देण्यासाठी वीरपणे पत्रकारिता करत राहील. आणखी शुभेच्छा तून मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. येणाऱ्या काळात सर्वांना त्यांच्या हक्काचा पत्रकार असल्यासारखं काम करेल करत आहे आणि करत राहील..
– प्रा.सचिन पवार
निर्भीड पत्रकार, अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद पाटोदा.
★माणुसकीची भिंत रोटी बँकला अन्नदान!
निर्भीड पत्रकार मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सचिन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकीची भिंत रोटी बँकला गुरुवारी अन्नदान ठेवले होते. सामाजिक कार्यात काम करत असताना ज्या पद्धतीने ते काम करत होते आज देखील त्याच पद्धतीने त्यांचे सामाजिक काम सुरू आहे. दत्ता देशमाने रामदास भाकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली माणुसकीची भिंत रोटी बँक या ठिकाणी निर्भीड पत्रकार सचिन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी अन्नदान करण्यात आले…