10 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

कर्तृत्वदक्ष सीएच डॉ.साबळे यांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन ; पत्रकार नागरिक आक्रमक!

★पाटोद्यात पत्रकार,जागृत नागरिकांची मागणी, नसता आंदोलनाचा दिला इशारा

पाटोदा | प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर,रुग्णांसाठी देवदूत असणारे डॉ.सुरेश साबळे साहेब यांच्यावर झालेली चुकीचे निलंबन मागे घेणे बाबत पाटोदा तहसीलदार बी.जी.चितळे यांच्या मार्फत मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत,मा. उपविभागीय अधिकारी पाटोदा, मा.जिल्हा अधिकारी बीड यांना पत्रकार बांधव व जागृत नागरिकांच्या वतीने निवेदन पाटोदा येथे देण्यात आले.
बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर,रुग्णांसाठी देवदूत असणारे ,बीड जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे साहेब यांच्यावर झालेली निलंबन कारवाई चुकीची आहे.डाॕ.साबळे यांच्या कडे पदभार आल्यापासून त्यांनी स्वता: परिश्रम घेत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे. गोरगरीब जनतेस आरोग्यसेवा देत होते यामुळे गोरगरीब जनतेसह सामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत होता.त्यांचे निलंबन हे राजकीय नेत्यांच्या सूडबुद्धीने झाल्याचे दिसून येत आहे.असे निवेदन नमूद केले आहे.ज्या कारणांमुळे हे निलंबन करण्यात आले त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही.असे केल्यास चांगल्या व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.हे निलंबन पुर्णतः चुकीचे असुन ते निलंबन राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी. नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची गंभीर राज्य सरकारने नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले.यावेळी हमीदखान पठाण, राहुल जाधव,अजय जोशी, जावेद शेख, संतोष तांबे, रामदास भाकरे,फय्याज सय्यद, सतिष गर्जे,पवन अडागडे,विजय जाधव, शेख महेशर, सय्यद अलिम,जावळे दाजी, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!