12.8 C
New York
Monday, April 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमदार बाळासाहेब आजबेंचा आदेश निघाला ; कार्यकर्ते लागले कामाला!

★पाटोदा विश्रामगृहावरच्या आमदार आजबेंच्या बैठकीने कार्यकर्त्यात आले नवचैतन्य !

पाटोदा | प्रतिनिधी

नुकतीच महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर अजित दादा उपमुख्यमंत्री बनले आणि सत्तेचे चित्रच बदलले अनेक आमदारांनी अजितदादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा कामाला लागले. आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी देखील मतदार संघाच्या विकासासाठी अजितदादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या पद्धतीने कामाला लागले त्या पद्धतीने कार्यकर्त्याला सुद्धा कामाला लागण्याचे आदेश दिले. पाटोदा विश्रामगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्या बैठकीतून कार्यकर्त्यांना नवचैतन्य निर्माण होईल असे आदेश आणि विश्वास दिल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे आमदार आजबेंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गटामध्ये बैठका सुरू झाले आहेत.
पाटोदा विश्रामगृहावर आ.आजबे काकांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांना चैतन्य मिळाले आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले गेले अमळनेर जिल्हा परिषद गट डोंगर किनी जिल्हा परिषद गटामधील महत्त्वाच्या बैठका आज संपन्न झाल्या कार्यकर्त्यांचा उत्साह तितकाच वाढलेला दिसत आहे. आमदारांनी कार्यकर्त्यांना दिलेलं नवचैतन्य येणाऱ्या काळात नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह वाढवणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत तितक्यात ताकतीने उतरण्याचा संदेश देखील आजबे काकांनी दिला आहे. कार्यकर्त्याच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील असे देखील आजबे काकांनी बैठकीदरम्यान सांगितले. आज धरतीवर अमळनेर डोंगर किनी गटाच्या महत्त्वाच्या बैठका प्रत्येक गटामध्ये संपन्न झाल्या यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करत यावर तितक्यात जोमानं काम करण्याचा उत्साह कार्यकर्त्यांनी बैठकीतून दाखवून दिला आहे.

★पदाधिकारी लागले कामाला!

अंमळनेर, डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार बाळासाहेब आजबेंनी पाटोदा येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांना नवचैतन्य निर्माण होण्यासाठी दिलेले कानमंत्र आणि त्याचं तंतोतंत पालन करताना कार्यकर्ते दिसत आहेत. आमदार बाळासाहेब आजबे ज्या पद्धतीने कामाला लागले आहेत त्याच पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा तितक्यात जोमाने कामाला लागलेले दिसत आहे.

★पाटोदा तालुका, गट, गन प्रमुखांच्या लवकरच निवडी होण्याची माहिती ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका ते गट गणप्रमुखापर्यंत सर्वच निवडी लवकरच होण्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष पासून गट गन प्रमुखापर्यंत सर्वच पदाच्या निवडी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून त्या संदर्भात लवकरच बैठक सुद्धा घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार असल्याची सुद्धा माहिती आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!