लेखणीतून जनतेचे प्रश्न रस्त्यावर आणणारा पत्रकार !
सातत्याने रस्त्यावर राहून गोरगरीब दिनदलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजुर आदि सह वंचित घटक आणि उसतोड कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून लेखणीतून प्रश्न रस्त्यावर मानणारा पत्रकार अशी ख्याती असलेले प्राध्यापक सचिन पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी आज साजरा केला जातो आहे.
बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र कुसळंब येथील रहिवासी आणि लोकवास्तवचे मुख्य संपादक प्राध्यापक सचिन पवार यांनी गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारितेला वाहून घेतले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून म्हटल्या जाणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रात गुणवंतांना न्याय आणि अन्यायाला वाचा फोडताना अनेक वेळा सातत्याने रस्त्यावर राहून लेखणीच्या माध्यमातून रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न जेष्ठ नागरिकांचे प्रश्न महिला भगिनींच्या प्रश्न आधीसह विविध समस्या आणि सातत्याने या सामाजिक प्रवाहात राहून लेखणीतून शब्दबद्ध करण्यासाठी सदोदित वाहून घेतलेले पत्रकार अशी ख्याती त्यांची आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत तालुक्यातील विविध प्रश्न राजकीय विश्लेषण शेतकऱ्यांच्या समस्या पाणी प्रश्न आदी सह राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक वैचारिक शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यावर स्पर्श करत त्यामध्ये लिहिण्याचे त्यांनी काम केले आहे.एकूणच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम लोक वास्तवच्या माध्यमातून केले आहे अनेक पत्रकार बांधव मित्र मंडळींच्या माध्यमातून त्यांच्या तीन ऑगस्ट 2023 च्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण गोरगरिबांना विशेष वस्तूंचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच आराध्य दैवत श्रीक्षेत्र खंडेश्वर, श्रीक्षेत्र भगवान बाबा संत वामनभाऊ महाराज यांच्या सह देव देवतांच्या चरणी मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या भविष्यातील यशदायी प्रवासाला मनापासून प्रार्थना..!
– प्रा.बिभिषण चाटे