प्रा.सचिन पवार म्हणजे जनतेच्या हक्काचं आणि युवकांच्या प्रेरणेचा माईंड रीडर अँड पॉजिटिव फाइटर !
★ जनतेच्या हक्काचे व्यासपीठ वर्तमानपत्राच्या माध्यमातून तयार करणारे सचिन पवार
★स्वतःचा दुःख बाजूला सारत दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या दुःखात निरसन करणार हक्काचं नेतृत्व !
★सर्व धर्मीयांसोबत आपुलकीचे संबंध ठेवत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारे सचिन पवार एकमेव!
★ स्वकर्तुत्वांतून सामाजिक संदेश देणारे स्वतः करून दुसऱ्यांना करण्यासाठी प्रेरित करणारा नेतृत्व!
★लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या सामाजिक प्रश्नावर नेहमीच आवाज उठवणारे सचिन पवार सर्वांच्याच हक्काचे!
★ जगायचं तर दुसऱ्यासाठी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध सतत संघर्षाचा संदेश देणारे निर्भीड पत्रकार सचिन पवार
_______________________
जनतेच्या हक्काचं व्यासपीठ!
लोकवास्तव
_________________________
शुभेच्छा संदेश हक्काच्या माणसाकडून…
सामाजिक, राजकीय, धार्मिक, मैत्री, पत्रकारिता क्षेत्रात आपलं विशेष कौशल्य दाखवत सर्वांच्याच मनावर आपुलकीचं हक्काचं राज्य निर्माण करत सचिन पवार यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांच्या विचारांची शिकवण त्यांना मिळाल्याने आई-वडिलांच्या संस्कारातून आपल्या आयुष्याची शिदोरी घेऊन उज्वल भविष्याच्या शिखरावर चढण्याचं सामर्थ्य उराशी बाळगून संकटावर मात करत काम करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवत इतरांनाही प्रेरणादायी जीवन निर्माण व्हावं असंच कर्तुत्व सर्वांना दिसत आहे. जेव्हा जेव्हा मित्रांसमोर संकट उभा राहतो तेव्हा मित्रांच्या डोळ्यासमोर फक्त सचिन पवार यांचा चेहरा उभा राहतो… संकटाचा सामना कसा करायचा… त्याच्यावर पर्याय कसा निवडायचा… त्यातून यश कसं मिळवायचं हे फक्त सचिन पवार यांच्याकडून शिकायला मिळत… सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी स्वतःच कौशल्याचा वापर करत राजमुद्रा संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्याला उजाळा देत काम केले आहे.. राजकारणात देखील आपल्या वकृत्वाची सुनुक दाखवत अनेक मोठ्या नेत्यांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित केले आहे. धार्मिक क्षेत्रात सुद्धा भक्ती शक्तीचा संगम असल्याने छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराजांच्या विचारावर काम करण्याची त्यांची क्षमता बरच काही सांगून जाते… सध्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि गंभीर प्रश्नावर आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीडपणे पत्रकारिता करताना आपल्या सर्वांना सचिन पवार पाहायला मिळत आहेत… आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी बऱ्याचशा त्यांच्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही मित्रांनी प्रतिक्रिया घेऊन सुद्धा त्यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत… प्रथमता सचिन पवार यांना वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..
★लेखणीतून जनतेचे प्रश्न रस्त्यावर आणणारा पत्रकार!
सातत्याने रस्त्यावर राहून गोरगरीब दीनदलीत दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर आधी सह वंचित घटक आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने लेखणीतून आवाज उठवत गंभीर प्रश्न रस्त्यावर आणणारा पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. सातत्याने सामाजिक प्रवाहात राहून लेखणीतून शब्दबद्ध करण्यासाठी सदोदित वाहून घेतलेले पत्रकार म्हणून सुद्धा सचिन पवार यांची ख्याती आहे. त्यांच्या भविष्यातील यशदायी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा..
– प्रा.बिभिषण चाटे
पत्रकार लेखक उत्कृष्ट निवेदक
★कोणत्याही प्रसंगाचे एक मिनिटात लेखणीतून विश्लेषण करणारा पत्रकार
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारे निर्भीड,निस्वार्थी व प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून मी सचिन पवार यांच्याकडे पाहतो. त्यांचं अचूक लेखन एका मिनिटात कोणत्याही प्रसंगाचा विश्लेषण करून आपल्या लेखणीतून त्याच्यावर आवाज उठवण्याची क्षमता त्यांच्यात आहे असं मला वाटतं. लेखणीतून मोठ्या प्रश्नांना वाचा फोडणारी लेखणी त्यांच्याकडे आहे. त्यांच्यामुळे अनेक गंभीर प्रश्नावर प्रकाश पडला असून त्याच्यावर पर्याय देखील निघाले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा….
– गोकुळ इंगोले.
संपादक : बीड टाईम्स
★एखाद्या व्यक्तीकडून कितीही त्रास झाला तरी त्या समजून घेण्याची क्षमता!
जीवनामध्ये सामाजिक कार्यात राजकीय क्षेत्रात मैत्रीच्या विषयात एखाद्या मित्राकडून किंवा व्यक्तीकडून कितीही त्रास झाला तरी तिला समजून घेऊन त्याला योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता फक्त सचिन पवार यांच्यामध्येच आहे. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची क्षमता खरच त्यांच्यासारखी दुसऱ्याच नसावी असं मला वाटतं…
– उमेश पवार
खास मित्र कुसळंब.
★पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर!
आम्ही पत्रकारिता करत असताना सचिन हा सामाजिक कार्यात अग्रेसर होता. लेखणीची आवड असल्याने पत्रकारितेत आला आणि पत्रकारितेत वेगळीच ओळख निर्माण केली आता मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.तसेच सामाजिक कार्यात तितकेच अग्रेसिव्ह पणे काम करताना दिसत आहेत. समाजातील गंभीर प्रश्नावर लेखणीच्या माध्यमातून धार देत सामाजिक चळवळ उभा करण्याची सुद्धा त्यांची क्षमता वाखण्याजोगी आहे. आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
– अनिल गायकवाड
लोकमत पत्रकार पाटोदा.
★मी पाहिलेला जिद्दी हळवा आणि स्वाभिमानी सचिन!
पत्रकारिता सुरू केल्यानंतर आमचे संबंध आले. त्याचं पत्रकारिता करतानाच काम त्याचबरोबर सामाजिक आणि व्यावहारिक दृष्ट्या असणारा स्वाभिमान आणि हळवं पण हे त्याचं वेगळं पण दाखवण्याचं काम करतात. मी अगदी जवळून त्याचा अनुभव घेतला आहे. जितका हळवी तितकाच स्वाभिमानी सुद्धा सचिन मी पाहिला आहे, त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
– बाबुराव अण्णा धारक
खंडेश्वर केटर्स कुसळंब.
★उत्तम मार्गदर्शक आणि खंबीर साथ देणार नेतृत्व!
एखाद्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचं आणि त्याला योग्य मार्गदर्शन करायचं ही सचिन सर यांच्यामधील खासियत आहे. कोणत्याही व्यक्तीला मित्राला एकटे न सोडण्याची सुद्धा विशेष गुण आहे. संकटकाळी योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला कोणत्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहून हक्काने सांगणारा हक्काचा माणूस म्हटलं तरी अवघड ठरला नको अशा या हक्काच्या माणसाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
– शरद गवळी
राष्ट्रवादी गणप्रमुख पारगाव गट.
★सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता!
सचिन माझा लहान भाऊ असला तरी त्याच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आणि सगळ्यांना समजून सांगण्याची क्षमता आहे. त्याच्यातील हे वेगळेपण सर्वांनाच आपलेसे करते.त्याच्यात काम करण्याची जिद्द चिकाटी असल्याने आणि तेही संयमान हाताळण्याची सवय त्याच्यामध्ये विशेष आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
– प्रा.विलास पवार
मोठा भाऊ, धार्मिक अभ्यास..