मेजर अंकुश खोटे यांची त्रिदल सैनिक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी वर्णी !
आष्टी | प्रतिनिधी
मंगळवार दि. 01 ऑगस्ट रोजी दौंड जिल्हा अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील त्रिदल माजी सैनिक संघ आणि कमिटीची बैठक महाराष्ट्र राज्य कोर कमिटी अध्यक्ष मा.अशोकरावजी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या मीटिंगमध्ये कोर कमिटीचे सदस्य आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून 27 जिल्हा अध्यक्ष हजर होते. यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघाचे स्वयंघोषित माजी अध्यक्ष संदीप लगड यांच्यावर माजी सैनिकांना फसवल्याचे आरोप झाल्यामुळे त्यांची राज्याध्यक्ष या पदावरून हकालपट्टी करण्यात आली व सर्वानुमते या बैठकीमध्ये तात्काळ नव्या राज्य अध्यक्षांची निवड सर्वनुमते घोषित करण्यात आली.यावेळी झालेल्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्रातील 27 जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्रातील माजी सैनिकांच्या उपस्थितीमध्ये त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याचे नूतन अध्यक्ष श्री अंकुश खोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अंकुश खोटे यांनी यापूर्वी बीड जिल्हा अध्यक्षपदी काम करताना आजी माजी सैनिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते तसेच राज्यातील सैनिकांची संघटना बांधन्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता या कामाचा त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर्वांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत सर्वांनु मते राज्याध्यक्ष पदाची धुरा यांच्या खांद्यावर यावेळी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील महादेव बांगर बीड, शिंदे साहेब पुणे, दत्ता माळी सातारा, राजेंद्र आढाव सोलापूर, शरद पवार नगर, संजय मस्के नगर, मुख्यालय नाईक सांगली, देशमुख बुलढाणा, बन्सी दांडगे औरंगाबाद, सूर्यवाड परभणी, पगार साहेब नाशिक आदीसह इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व कोर कमिटीचे सर्व सदस्य सैनिक संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष व महाराष्ट्रातील बहुसंख्येने सैनिक उपस्थित होते यावेळी नवे राज्य अध्यक्ष अंकुश खोटे यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता राज्यातील सर्व आजी माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे व सोडवण्याचे यावेळी सर्वांना आश्वासन देत सर्वांचे आभार मानले.