मैत्रीचा राजा माणूस!
सामाजिक कार्याचा आवाज!
जनतेच्या समस्यावर एकच पर्याय!
प्रा.सचिन पवार
★निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यावर आवाज उठवणारा शास्त्र म्हणजेच सचिन पवार
★स्वतःचा दुःख बाजूला सारत दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या दुःखात निरसन करणार हक्काचं नेतृत्व!
★अतिकठीण संकटाचा सामना कसा करायचा हे फक्त सचिन पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल!
★सर्व धर्मीयांसोबत आपुलकीचे संबंध ठेवत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारे सचिन पवार एकमेव!
★सर्वांच्या विचारातून स्वतःच्या विचाराला धार देऊन नवीन विचाराचा उदय करणारे सचिन पवार
★लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या सामाजिक प्रश्नावर नेहमीच आवाज उठवणारे सचिन पवार सर्वांच्याच हक्काचे!
★पाटोदा तालुक्यातील निर्भीड पत्रकार म्हणून सचिन पवार यांची विशेष ओळख!
______________________________________
जनतेच्या हक्काचं व्यासपीठ लोकवास्तव…
______________________________________
भावना आणि शुभेच्छा हक्काच्या माणसाकडून….
सामाजिक, राजकीय, धार्मिक, मैत्री, पत्रकारिता क्षेत्रात आपलं विशेष कौशल्य दाखवत सर्वांच्याच मनावर आपुलकीचं हक्काचं राज्य निर्माण करत सचिन पवार यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांच्या विचारांची शिकवण त्यांना मिळाल्याने आई-वडिलांच्या संस्कारातून आपल्या आयुष्याची शिदोरी घेऊन उज्वल भविष्याच्या शिखरावर चढण्याचं सामर्थ्य उराशी बाळगून संकटावर मात करत काम करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवत इतरांनाही प्रेरणादायी जीवन निर्माण व्हावं असंच कर्तुत्व सर्वांना दिसत आहे. जेव्हा जेव्हा मित्रांसमोर संकट उभा राहतो तेव्हा मित्रांच्या डोळ्यासमोर फक्त सचिन पवार यांचा चेहरा उभा राहतो… संकटाचा सामना कसा करायचा… त्याच्यावर पर्याय कसा निवडायचा… त्यातून यश कसं मिळवायचं हे फक्त सचिन पवार यांच्याकडून शिकायला मिळत… सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी स्वतःच कौशल्याचा वापर करत राजमुद्रा संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्याला उजाळा देत काम केले आहे.. राजकारणात देखील आपल्या वकृत्वाची सुनुक दाखवत अनेक मोठ्या नेत्यांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित केले आहे. धार्मिक क्षेत्रात सुद्धा भक्ती शक्तीचा संगम असल्याने छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराजांच्या विचारावर काम करण्याची त्यांची क्षमता बरच काही सांगून जाते… सध्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि गंभीर प्रश्नावर आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीडपणे पत्रकारिता करताना आपल्या सर्वांना सचिन पवार पाहायला मिळत आहेत… आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी बऱ्याचशा त्यांच्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही मित्रांनी प्रतिक्रिया घेऊन सुद्धा त्यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत… प्रथमता सचिन पवार यांना वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..
★कठीण संकटाला संयमान हाताळण्याची क्षमता!
प्रत्येकाला संकटाचा सामना करावाच लागतो. त्या संकटाचा सामना करताना कशा पद्धतीने आपण त्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन पवार आहे असं वाटतं… प्रत्येकालाच संकट येतात पण त्याचा सामना करण्याची ताकद प्रत्येकामध्ये नसते असं वाटत असेल पण विचार केला तर ती ताकद प्रत्येकामध्ये असते फक्त ती आपल्याला जागृत करावी लागते.. आणि तीच ताकद सचिनने स्वतःमध्ये जागृत केले आणि मोठ्या मोठ्या संकटाचा सामना अगदी सहजपणे करत गेला तेही अगदी संयमान सहजपणे हसमुख चेहऱ्याने हा त्यांच्यातील विशेष गुण आहे, असं मला वाटतं. कारण की मानसिक डिप्रेशन सारखं दुसरं मोठं आजारपण कोणतच नाही..आणि त्या डिप्रेशन अगदी सहजपणे हसमुख चेहऱ्याने आणि संयमान हाताळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.असं मला वाटतं…
– बाळासाहेब हुलजुते
वर्गमित्र, रंगवर्षा फोटो स्टुडिओ कुसळंब.
★महापुरुषांच्या विचाराला लेखणीची धार देणारे
निर्भीड पत्रकारिता उत्कृष्ट वक्ता प्राध्यापक सामाजिक जाण असलेला सर्व धर्म समभाव असलेले व्यक्तिमत्व स्वतःच्या विचारावर ठाम असलेले व सर्व महापुरुष यांचे विचार आपल्या लेखणीतून सांगणारे उत्कृष्ट असे आमचे मित्र तसेच आपल्या शत्रूला वैचारिक अणुबॉम्ब टाकून शत्रूला घाम फोडणारे. व सर्वांना आपलेसे वाटणारे.आमचे परममित्र प्राध्यापक सचिनजी सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
– डॉ.सुनील गायकवाड
★पत्रकारितेतील कोहिनूर हिरा!
प्रा.सचिन पवार यांना पत्रकारीतेतील “कोहिनूर हिरा”म्हणले तरी वावगे ठरणार नाही.त्यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक बोगसगिरी कामांचा पडदा पास केला असून सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य उत्तमरीत्या करत आहेत. त्यांचे कार्य नवपत्रकारांना नक्कीच आदर्श ठरणारे आहेत. उच्चशिक्षीत,उत्तम संघटन कौशल्य म्हणूनही प्रा.सचिन पवार यांचे कार्य कौतुकास्पद असुन त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
– जावेद शेख
पत्रकार पाटोदा.
★अभ्यासू आणि लेखन कला विशेष कौतुकास्पद!
सचिन पवार सर यांची आणि माझी भेट
सौताडा येथे अण्णासाहेब शिंदे यांनी करून दिली होती.मला दैनिक दिव्य लोकप्रभा वृत्तपत्रासोबत नुकतेच काम मिळाले होते.सचिन सर म्हणजे नेहमी हसतमुख चेहरा व कोणत्याही व्यक्तीला बोलल्याशिवाय पुढे जायचं नाही असा त्यांचा स्थायीभाव.मराठी पत्रकार परिषदेत काम करत असताना शिक्षकांची शिस्त, जबाबदारपणा मला नेहमीच जाणवला …एखादं काम होत असल तर होईल होणार नसेल तर आश्वासन द्यायचं नाही हा मला आवडलेला त्यांचा गुणविशेष अत्यंत महत्त्वाचे विषयावरील अभ्यास व लेखण कला ही त्यांची जमेची बाजू आहे… त्यांनी स्वतःचा लोक वास्तव पेपर सुरू करून ते संपादन करू शकतात हे सिद्ध झाले…सचिन सरांचा आज वाढदिवस त्यांना दैनिक दिव्य लोकप्रभा परिवार व माझ्या बहुजन आक्रोश मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून कोटी कोटी शुभेच्छा…
–प्रदिप उबाळे अध्यक्ष बहुजन आक्रोश मोर्चा पाटोदा.
★स्व: कर्तुत्वावर तयार झालेले नेतृत्व!
ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नावर आवाज उठवत स्वकर्तृत्व तयार केले आहे. वर्तमानपत्र, शिक्षण, उद्योग, शेती, सामाजिक कार्य, सामाजिक संघटना अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या काम व वंचित घटका विषयी असलेली कजब व सामाजिक कार्याची आवड असल्याने एक वेगळी ओळख निर्माण करून सर्वांनाच आकर्षित केले आहे..
– दत्ता देशमाने
संयोजक माणुसकीची भिंत पाटोदा.
★कामाला महत्त्व पण आक्रमकपणा खूप!
माझ्या भावा प्रमाणेच मी सचिनला सुद्धा समजतो. सचिन कामाच्या बाबतीत अतिशय प्रयत्नशील आणि महत्त्व देणारा आहे. माझं काम करताना ते काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहणं ही त्याची विशेष सवय आहे. पण एखादं काम होणार जर पुढून एखाद्याकडून नाही म्हटलं तर त्याच्यावर आक्रमकपणे त्याच्या भाषेमध्ये व्यक्त होणार… हा त्याच्यातील वेगळा गुण आहे…कधी कधी तो त्याचा राग लेखणीमधून सुद्धा व्यक्त करतो… जास्त राग आल्यावर जास्त बातम्या लिहायला सुरू करतो…पण सचिन सारखे तूरळकच आहेत जे कामावर प्रेम करतात आणि न झाल्यावर आक्रमक होतात… त्याने लेखणीच्या जोरावर अनेकांना प्रकाश झोतात आणलं.. आता मात्र कर्तुत्व असूनही दूर राहिला… म्हणूनच राजमुद्रा संघटनेची सर्व धुरा त्याच्या हातात दिली… काळजी करू नको मी आहेच…माझ्याकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
– किशोर आप्पा पिंगळे
संस्थापक अध्यक्ष राजमुद्रा सामाजिक संघटना बीड ( महाराष्ट्र राज्य )
★वक्तृत्वाच्या जोरावर सर्वांनाच आपलंसं करणार नेतृत्व!
राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपल्याकडे एखादा विशिष्ट गुण असला सर्वच आपल्याकडे आकर्षित होतात. सचिन कडे सुद्धा वकृत्वाचा जबरदस्त गुण असल्याने त्याने सर्वांनाच आकर्षित केले आहे. संघटन कौशल्य आणि लेखणीच्या जोरावर अनेकांना न्याय देत सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. आमचे सहकारी म्हणून त्यांच्यातील अनेक गुण आम्हाला सांगता येतील परंतु काही गुण असे असतात की अधिक लक्ष केंद्रित करतात स्पष्ट बोलणे आणि कामावर भर देऊन सर्वांनाच आकर्षित करणे अशा अनेक गुणांनी संपन्न झालेले. लेखणीतून निर्भीडपणे मत मांडले आणि सर्वांनाच लेखणीची ताकद दाखवून दिली आहे..
– पै.सतीश आबा शिंदे
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य बीड.
★न्याय, सामाजिक संदेश देणारा एक खरा पत्रकार!
एक निर्भीड पत्रकार, कायम गोरगरीब लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या दैनिकात छापून त्याला वाचा फोडून न्याय देणारा एक खरा पत्रकार, आपल्या आईचा अंत्यविधी झाल्यावर जी राख असते ती राख आपल्या शेतात पुरून त्या ठिकाणी झाड लावून आपल्या आईला सदैव स्मरणात ठेवणारा निसर्गप्रेमी पत्रकार, पत्रकरिता बरोबरच एक आदर्श पिढी व सुसंस्कारित पिढी घडवणारा आदर्श शिक्षक, अशा अनेक उपमा आहेत ज्या की कमी पडतील अशा आमच्या सचिन पवार सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप लक्ष लक्ष शुभेच्छा..
– संदीप जाधव
समाजसेवक, मराठासेवक, व्यावसायिक.
★लेखणीतून जनतेचे प्रश्न रस्त्यावर आणणारा पत्रकार!
सातत्याने रस्त्यावर राहून गोरगरीब दीनदलीत दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर आधी सह वंचित घटक आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने लेखणीतून आवाज उठवत गंभीर प्रश्न रस्त्यावर आणणारा पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. सातत्याने सामाजिक प्रवाहात राहून लेखणीतून शब्दबद्ध करण्यासाठी सदोदित वाहून घेतलेले पत्रकार म्हणून सुद्धा सचिन पवार यांची ख्याती आहे. त्यांच्या भविष्यातील यशदायी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा..
– प्रा.बिभिषण चाटे
पत्रकार लेखक उत्कृष्ट निवेदक
★कोणत्याही प्रसंगाचे एक मिनिटात लेखणीतून विश्लेषण करणारा पत्रकार
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारे निर्भीड,निस्वार्थी व प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून मी सचिन पवार यांच्याकडे पाहतो. त्यांचं अचूक लेखन एका मिनिटात कोणत्याही प्रसंगाचा विश्लेषण करून आपल्या लेखणीतून त्याच्यावर आवाज उठवण्याची क्षमता त्यांच्यात आहे असं मला वाटतं. लेखणीतून मोठ्या प्रश्नांना वाचा फोडणारी लेखणी त्यांच्याकडे आहे. त्यांच्यामुळे अनेक गंभीर प्रश्नावर प्रकाश पडला असून त्याच्यावर पर्याय देखील निघाले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…
– गोकुळ इंगोले.
संपादक : बीड टाईम्स
★एखाद्या व्यक्तीकडून कितीही त्रास झाला तरी त्या समजून घेण्याची क्षमता!
जीवनामध्ये सामाजिक कार्यात राजकीय क्षेत्रात मैत्रीच्या विषयात एखाद्या मित्राकडून किंवा व्यक्तीकडून कितीही त्रास झाला तरी तिला समजून घेऊन त्याला योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता फक्त सचिन पवार यांच्यामध्येच आहे. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची क्षमता खरच त्यांच्यासारखी दुसऱ्याच नसावी असं मला वाटतं…
– उमेश पवार
खास मित्र कुसळंब.
★पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर!
आम्ही पत्रकारिता करत असताना सचिन हा सामाजिक कार्यात अग्रेसर होता. लेखणीची आवड असल्याने पत्रकारितेत आला आणि पत्रकारितेत वेगळीच ओळख निर्माण केली आता मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.तसेच सामाजिक कार्यात तितकेच अग्रेसिव्ह पणे काम करताना दिसत आहेत. समाजातील गंभीर प्रश्नावर लेखणीच्या माध्यमातून धार देत सामाजिक चळवळ उभा करण्याची सुद्धा त्यांची क्षमता वाखण्याजोगी आहे. आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
– अनिल गायकवाड
लोकमत पत्रकार पाटोदा.