★छत्रपती संभाजीनगरात 2 तर बीडमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या !
बीड | प्रतिनिधी
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्रकाही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तर बीड जिल्ह्यात एकाने जीवन संपवले. पैठणता लुक्यातील मुरमा येथीलउमेश कल्याण फटांगडे(२७) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी (३१जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोरआले.
उमेश हे वाहनचालक म्हणून पाचोड येथे कामावर होते. तसेच त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यंदात्यांनी कपाशीची लागवड केली, परंतु पाऊस लांबल्याने पिकाची लागवड उशिराने झाली.त्यामुळे यंदा उत्पादनात घट होऊन उत्पन्नहाती येणार नाही, अशी त्यांना चिंता सतावत होती. त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून दीडलाखाचे व शासकीय बचत गटाकडूनही कर्जघेतले होते. खासगी व्यक्तींकडून घेतलेली हात उसनी रक्कम कशी फेडायची याविवंचनेत ते असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सोमवारी ते पाचोडहून घरीआल्यानंतर शेतात गेले. उशिरापर्यंत घरी नआल्याने रात्री आई शेतात गेली असता त्यांनीबाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसले. मृतदेह पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी तपासून मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोषमाने, पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवालकरत आहेत.दुसऱ्या घटनेत सततच्या नापिकीला कंटाळून धारूर तालुक्यातील कुंडी येथील तरुण शेतकरी रंगनाथ शत्रुभुज काळे (३१)यांनी गुराच्या गोठ्यात जाऊन गळफास घेतआत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेघडली. रंगनाथ हे निसर्गाचा लहरीपणा आणिसततच्या नापिकीमुळे निराश झालेले होते.सिरसाळा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतरमृतदेह सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातउत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणीपुढील तपास सुरु आहे.
★शेतकरी मुलाने कर्जाच्या विवंचनेत घेतला गळफास
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकरी मुलाने कर्जाला कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. कृष्णा प्रकाश शिरसाठ(२३) असे आत्महत्याकरणाऱ्या शेतकऱ्याचे नावआहे. ही घटना मंगळवारी पहाटे ३ वाजता उघडकीस आली. कृष्णाच्यावडिलांच्या नावे बँक कर्जअसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतदेह झाडावरून खाली उतरवून अजिंठा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आला. कृष्णाच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असापरिवार आहे. दरम्यान, कृष्णाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तलाठी गणेश गोरडे यांनी पंचनामाकेला. पुढील तपास एपीआय प्रमोदभिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अक्रम पठाण, संदीप कोथळकर, भागवत शेळके करत आहेत.
★सात महिन्यांत ५८३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मागील ७महिन्यांत ५८३ शेतकऱ्यांनी आपले जीवनसंपवले आहे. जालना ३६, परभणी ५१,छत्रपती संभाजीनगर ८६, हिंगोली २०,लातूर ३५, उस्मानाबाद १०१, नांदेड १०० वबीड १५५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेआहे. शेतकरी कुटुंबाला मदतीसाठीचौकशीसाठी एकूण १०९ प्रकरणे प्रलंबितअसल्याची शासन दप्तरी नोंद आहे.