नवनिर्माण प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा शहरातील नवनिर्माण प्राथमिक शाळा पाटोदा या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण सर व प्रमुख पाहुणे शाळेचे सहशिक्षक श्री डोके सर हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्यांच्या जीवनावर माहिती सांगितली.अध्यक्षिय स्थानावरून मार्गदर्शन करताना पठाण सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व विद्यार्थी जीवनात वक्तृत्व स्पर्धेचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.तसेच भाषणात सहभाग असणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षीसांचे वाटप केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जायभाय सर यांनी केले. सदरील कार्यक्रमाला श्रीम. सानप मॅडम, बांगर मॅडम, भोसले सर, गाढवे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.