लोकशाहीर…
अण्णाभाऊ साठे शिकले
फक्त दीड दिवसाची शाळा,
अस सुशिक्षित असूनही त्यांना
होता मराठी साहित्याचा लळा.
कथा कादंबऱ्या अन काव्य
सहज सोप्या भाषेत लिहिलं,
पुरोगामी महाराष्ट्राचं खरं रूप
त्यांच्या लिखाणात मी पाहिलं.
शेतकरी, कष्टकरी, वंचित अन
दलितांच्या प्रश्नावर आवाज उठवला,
बाबासाहेबांना गुरु मानून त्यांनी
जणू क्रांतीचा संदेश पाठवला.
पोवाडा गाणी वघनाट्य अन
त्यांच्या लावण्याही इथे गाजल्या,
परदेशातही कौतुक झालं अन
रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजल्या.
रशियाला जाऊन छत्रपती
शिवरायांवर पोवाडा गायला
अण्णांचा शाहिरी बाणा मात्र
उभ्या महाराष्ट्राच्या ध्यानात राहिला.
अण्णा तुम्ही गेल्यावर सारा
महाराष्ट्र झाला होता स्तब्ध,
पण तुमच्या साहित्याला आम्ही
लक्षात ठेवलाय शब्द ना शब्द…!
शब्द ना शब्द….!!
– श्री.संजय शेळके
रा.पांढरी ता.आष्टी जि.बीड.
मो.नं.99752 28585